७५० हेक्टर जमिनीला मिळणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:58 PM2017-09-28T23:58:48+5:302017-09-28T23:59:10+5:30
सावली तालुक्यातील गेवरा परिसरामध्ये अत्यल्प पाऊस पडला. सिंचनाचा अभाव असल्याने हजारो हेक्टरवर धान पिके घेणारा शेतकरी संकटात सापडला असताना जनकापूर ते विहिरगावदरम्यान अपूर्ण अवस्थेतील....
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवरा : सावली तालुक्यातील गेवरा परिसरामध्ये अत्यल्प पाऊस पडला. सिंचनाचा अभाव असल्याने हजारो हेक्टरवर धान पिके घेणारा शेतकरी संकटात सापडला असताना जनकापूर ते विहिरगावदरम्यान अपूर्ण अवस्थेतील बीएस उपकालव्याचे लोकवर्गणी, श्रमदान व स्थानिक आमदार यांच्या अर्थसहयोगातून बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर संबंधित प्रशासनाने आज गुरुवारी आमदार तथा विधीमंडळ उपगट नेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते जलपूजन करून सिंचनाचा मार्ग मोकळा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे, तालुका अध्यक्ष राजेश सिद्धम, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष उषा भोयर, पं.स. सदस्य संगिता चौधरी, उर्मिला तरारे यांच्यासह परिसरातील शेकडो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
अनेक वर्षापासून या उपकालव्याचे बांधकाम रेंगाळलेले होते. शासनाकडून निविदा प्रक्रियाच पुढे सरकली नाही. गेवरा परिसरातील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याविना धोक्यात होती. सहनशिलतेचा अंत झाल्याने सात गावातील शेतकºयांनी मिशन पाणी समन्वय समिती स्थापन करुन कालव्यातून पाणी आणायचा संकल्प केला व प्राधिकरणचे कार्यकारी अभियंत्यांकडून परवानगी घेऊन लोकसहभागातून व वर्गणी गोळा करून अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात आले. यामुळे गोसीखुर्दचे पाणी विहीरगाव, बोरमाळा, कसरगाव, गेवराखुर्द, गेवरा बुज, डोंगरगाव सातखेडा या गावातील धान पिकांना मिळणार आहे.