साडेचार कोटींतून ७७ सिमेंट प्लग बंधारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:27 AM2018-01-05T00:27:03+5:302018-01-05T00:28:09+5:30
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग बंधारे, लघु पाटबंधाऱ्यांचे बांधकाम केले जात आहे. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग बंधारे, लघु पाटबंधाऱ्यांचे बांधकाम केले जात आहे. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होत आहे. २०१६-१७ या वर्षात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ४ कोटी ८७ लाख २६ हजार रूपये खर्च करून ७७ सिमेंट प्लग बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. या बंधाऱ्यातून ५४१ हेक्टरवर सिंचन निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात सात ते आठ सिंचन प्रकल्प असले तरी अनेक शेतकºयांना या सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. त्यामुळे अनेकांना निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागते. चांगला पाऊस पडला तर उत्पादन नाही तर निराशा, अशी शेतकऱ्यांची स्थिती असते. यावर्षी जिल्ह्यात ५० टक्केच पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पही भरले नाही. परिणामी पिकाला पाणी देण्यासाठी शेवटच्या क्षणी शेतकºयांची धावपळ झाली.
दरवर्षी शेवटच्या पाण्यासाठी शेतकऱ्याची होणारी धावपळ थांबविण्यासाठी वाहून जाणाऱ्या नाल्यावर बंधारे बांधण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेने आखला आहे. या कार्यक्रमातून बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे. २०१६-१७ या वर्षांत ८ लघु पाटबंधारे तलाव, ४ कोल्हापुरी बंधारे व ८३ सिमेंट प्लग बंधाऱ्यांचे काम सुरू करण्यात आले. यातील ३ कोल्हापुरी बंधारे व ७७ सिमेंट प्लग बंधाºयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
या तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ
भद्रावती तालुक्यातील ५ गावांमध्ये सिमेंट प्लग बंधाऱ्याचे बांधकाम झाले आहे. तर मूल तालुक्यात ६, वरोरा ३, बल्लारपूर १, ब्रह्मपुरी ६, राजुरा १३, कोरपना ५, सिंदेवाही ७, चिमूर १२, जिवती ६, गोंडपिपरी ६, चंद्रपूर १ व नागभीड तालुक्यात ६ गावांमध्ये बंधाºयाचे बांधकाम झाले आहे.