कौटुंबिक कलहातून ७७५ जणांनी सोडले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:32 AM2021-01-08T05:32:18+5:302021-01-08T05:32:18+5:30
सध्याच्या युगात संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. यामुळे कौटुंबिक कलह निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. कौटुंबिक ...
सध्याच्या युगात संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. यामुळे कौटुंबिक कलह निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. कौटुंबिक कलह आणखी वाढू नये, म्हणून अनेकांनी स्वत:हून घर सोडल्याच्या अनेक तक्रारी आहेत. सुन-सासूचे भांडण, सुनेकडून ज्येष्ठ आई-वडिलांच्या अवहेलना यामुळे अनेकांनी आपल्या मुलाचे तर काहीनी मुलीला त्रास नको म्हणून वृद्धाश्रमात आश्रय घेतला. तर काही वृद्धांनी आश्रम जवळ केल्यास मुलगा, मुलगी यांची बदनाम होईल म्हणून थेट कुणालाही न सांगता घरच सोडले. तर अनेक मुले-मुली आई-वडिलांकडून किटकिट नको म्हणून किंवा आमिषाला बळी पडून तसेच सासरच्या व्यक्तीकडून छळ झाल्यास घर सोडून गेली आहेत. सन २०२० मध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातून २६५ पुरुष, ५१० महिला बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये १९८ पुरुष व ४०० महिलांचा शोध लागला आहे, तर अद्यापही १७७ जणांचा शोध सुरू आहे.
घर सोडून जाण्याचे कारण
कौटुंबिक कलहातून अनेकांनी घर सोडले आहे. त्यासोबतच मुलगा आणि सुनेकडून अवहेलना होत असल्यामुळे त्रासून ज्येष्ठ आई-वडिलांनी घर सोडले. तर अनेक मुले-मुली यांनी आई-वडिलांची किटकिट नको म्हणून घर सोडले. तर अनेक मुले-मुली आमिषाला बळी पडून स्वत:हून घर सोडून पळाल्या आहेत. तर सासूच्या त्रासाला कंटाळून अनेक सुनांनी घर सोडल्याचा प्रकार दिसून येत आहे. काही जणांचा तपास पोलिसांनी लावला आहे.