चंद्रपुरात ७७८ गावे बाधित, ११,२२९ हेक्टर शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 08:40 AM2024-07-23T08:40:13+5:302024-07-23T08:40:27+5:30

गोसेखुर्दचे ३३ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले; गोंदियात पिके पाण्याखाली, पुरामुळे दहा मार्ग बंद

778 villages affected in Chandrapur, 11,229 hectares of agriculture lost | चंद्रपुरात ७७८ गावे बाधित, ११,२२९ हेक्टर शेतीचे नुकसान

चंद्रपुरात ७७८ गावे बाधित, ११,२२९ हेक्टर शेतीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर : पूर्व विदर्भात तीन ते चार दिवसांपासून सलग जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे. शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसातील पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन ११ हजार २२९.४० हेक्टर क्षेत्रातील पिकांना तडाखा बसल्याची प्राथमिक माहिती आहे. पुरामुळे ७७८ गावे बाधित झाली. मूल व सावली तालुक्यात नुकसानीची तीव्रता अधिक आहे. पुरामुळे १५ हजार ५२५ शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. तलाव फुटल्याने हाहाकार उडालेल्या चिचपल्ली गावातील पाणी ओसरले; पण पुराच्या पाण्याने अनेकांच्या घरांची पडझड झाली. जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या.

पिके सडण्याचा धोका 
nगोंदिया : जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी चौथ्या दिवशीही कायम होता. 
nत्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, आठ ते दहा मार्ग अद्यापही बंद आहेत.  
nतीन दिवसांपासून हजारो हेक्टरमधील पिके पाण्यात गेली. 

पुराचा फटका; १,५५५ कुटुंबांना हलविले
nभंडारा : आसगाव (ता. पवनी) तर ओपारा, राजनी (ता. लाखांदूर) येथे अतिवृष्टीचा तडाखा बसला.
nतिन्ही गावे मिळून एकूण १,५५५ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यातील १३ मंडळात अतिवृष्टी झाली.

पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात साेमवारी पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पंचगंगा नदीने सकाळी इशारा पातळी (३९.२ फूट) ओलांडली. तब्बल ७८ बंधारे आणि ३८ मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. धरणक्षेत्रात अद्याप पाऊस सुरू आहे. राधानगरी धरण ८५% भरले, त्यातून प्रतिसेकंद १४५० घनफूट विसर्ग सुरू आहे.  

कृष्णा खोऱ्यात जोर
सांगली : कृष्णा नदीची पाणीपातळी सोमवारी दुपारी २६ फुटांपर्यंत पोहोचली. कृष्णा खोऱ्यात पावसाचा जोर असल्यामुळे अलमट्टी धरण प्रशासनाने एक लाख ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.  

Web Title: 778 villages affected in Chandrapur, 11,229 hectares of agriculture lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.