वन्यप्राण्यांच्या नुकसानीपोटी ७.९१ कोटींंची भरपाई

By admin | Published: October 4, 2016 12:45 AM2016-10-04T00:45:28+5:302016-10-04T00:45:28+5:30

जिल्हयात वनांचे प्रमाण भरपूर आहे. या वनांमध्ये विविध प्रकारचे प्राणीही मोठया प्रमाणावर आहे.

7.91 crores compensation for wildfishing loss | वन्यप्राण्यांच्या नुकसानीपोटी ७.९१ कोटींंची भरपाई

वन्यप्राण्यांच्या नुकसानीपोटी ७.९१ कोटींंची भरपाई

Next

नुकसानीची १३ हजार ३९८ प्रकरणे : भरपाईचा शेतकऱ्यांना दिलासा
चंद्रपूर : जिल्हयात वनांचे प्रमाण भरपूर आहे. या वनांमध्ये विविध प्रकारचे प्राणीही मोठया प्रमाणावर आहे. या प्राण्यांकडून शेती व अन्य पिकांच्या होणा-या नुकसानीचा मोबदला शासनाकडून दिला जातो. जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात झालेल्या विविध नुकसानीपोटी शेतक-यांना ७ कोटी ९१ लक्ष रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.
वन्यप्राण्यामुळे कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात सर्वत्र हल्ले व शेती पिकांचे नुकसान होत असते. अशा नुकसानीत नुकसाग्रस्त शेतक-याना मदतीचा हात शासनाच्या वतीने दिला जातो. नुकसान झाल्यास वन विभागाच्या वतीने नुकसानीची पाहणी करुन मदत केली जात असते. वन्यप्राण्यांकडून होणारी नुकसानीमध्ये काही प्रसंगी मनुष्यहानी होते. मनुष्य जखमी होणे, पशुधनहानी, पशु जखमी, पीकहानी अशा घटना घडत असतात.
२०१५-१६ मध्ये नुकसानीची ११ हजार २४७ प्रकरणे घडली होती. या पोटी नुकसान भरपाई म्हणून ६ कोटी २६ लाख रुपये मदत देण्यात आली. या वर्षात सहा मनुष्यहानीची प्रकरणे होती. या व्यक्तींच्या कुटुंबियाना ४७ लाखांची मदत वन विभागाने केली. हल्ल्यार १५४ जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या. या जखमींना ५६ लाख ३२ हजार रुपये मदत देण्यात आली आहे. पशुधन हानीच्या १४८८ घटनेत ९० लाख ५० हजार तर पशु जखमीच्या १२६ प्रकरणात १ लाख ८ हजारांची मदत वितरित करण्यात आली आहे.
याच वर्षी पीकहानीची ९ हजार ४७३ प्रकरणे उद्भवली होती. यामध्ये शेतीपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ४ कोटी ३१ लाख ४४ हजार रुपये वन विभागाच्या वतीने वितरित करण्यात आले आहे. यावर्षी जून अखेर २ हजार १५१ नुकसानीची प्रकरणे घडली आहे. या प्रकरणामध्ये १ कोटी ६५ लाखांची मदत जूनपर्यंत देण्यात आली आहे. यामध्ये मनुष्यहानीच्या तीन प्रकरणांत २३ लाख, मनुष्य जखमीच्या १६ प्रकरणात ४ लाख ४३ हजार, पशुधन हानीची २१० प्रकरणे व १३ लाख ७७ हजार, पीकहानीची १९१७ प्रकरणे घडली असून यातील १ कोटी २३ लाख ५८ हजार वितरित करण्यात आले.

Web Title: 7.91 crores compensation for wildfishing loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.