८९ रब्बी गावे झाली खरीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:21 AM2017-08-05T00:21:04+5:302017-08-05T00:21:27+5:30
जिल्ह्यातील १८३६ गावांपैकी १७४७ गावे खरीप हंगामासाठी तर ८९ गावे रब्बी हंगामाची म्हणून महसूल विभागाने घोषित केली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील १८३६ गावांपैकी १७४७ गावे खरीप हंगामासाठी तर ८९ गावे रब्बी हंगामाची म्हणून महसूल विभागाने घोषित केली आहेत. मात्र सद्य:स्थितीत रब्बी हंगामासाठी घोषित असलेल्या ८९ गावांमध्ये दोन तृतीयांश टक्क्यापेक्षा जास्त खरीप पिके घेतली जातात. त्यामुळे अशा गावांना खरीप गावाच्या सवलती मिळू शकत नाही. त्यामुळे सदर ८९ गावे रब्बी मधून खरीपात रुपांतरण करण्यात आली आहेत. याबाबत काही आक्षेप असल्यास संबधित तहसिल कार्यालयाकडे १० आॅगस्टपर्यंत लेखी स्वरुपात सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
खरिपात समावेश करण्यात आलेल्या गावांमध्ये चंद्रपूर तालुक्यातील चांदा रै., गोंविंदपूर रिठ, बोर रिठ, वडगाव, दे.गो.रै. दूगार्पूर, ऊर्जानगर, नेरी, रानवेडली, कोंडीमाल, कोंढीचक, आंबोरा, लखमापूर, चांदसुर्ला, चकबोर्डा, चकवलणी, चकनिंबाळा, वायगाव चक नं.१, अजयपूर, गोंडसावरी, निलजई, अडेगाव, किटाळी, चिंचोली, वढोली, मसाळा रिठ, चिंचाळा, उमरी रिठ, गवराळा, चारगाव, छोटा नागपूर, विचोडा रै, विचोडा बु. पडोली, दाताळा, कोसारा, खुटाळा, देवाडा, चोराळा, शिवणी चोर, हिगनाळा व आरवट अशी ४२ गावे आहेत.
तर चिमूर तालुक्यातील भिवकुंड, खापरी जां, माकोना, तळोधी गावगन्ना, दलदली रिठ, पेढरी भागडे, टेकेपार रिठ, खापरी, पेढरी तु. नवीन नवेगाव, मासाळ खूर्द, वडसी, वाघेडा, टाकी रिठ, खापरी मजरा, सिरसपूर, निमढेला रिठ, सोनेगाव गांवडे अशी १८ गावे, बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे, हडस्ती, चारवट, माना, बल्लारपूर, विसापूर, कळमना, जोगापूर, आष्टी, दहेली, लावारी, आमडी, आसेगाव, कोठारी, खामतुर्ली व काटवली असे १६ गावे, मुल तालुक्यामधील खंडाळा रै, कोरंबी, बोरघाट चक, बोरघाट माल, म्हसबोडण, चक दहेगाव व कन्हाळगाव अशी ७ गावे आणि सावली तालुक्यातील आकापूर, गेवरा चक, पेंढरी चक, वढोली गांडली, चक वढोली व मोवाड चक या ६ अशा ८९ गावांचा समावेश आहे, असे जिल्हाधिकाºयांनी कळविले आहे.