८० मजूर संस्था मालामाल

By admin | Published: January 6, 2015 10:57 PM2015-01-06T22:57:07+5:302015-01-06T22:57:07+5:30

जिल्ह्यातील ८० मजूर सहकारी संस्थांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे २७० कामे वाटप करण्यात आले. या कामांची किमंत २२ कोटी रुपयांच्या घरात असून या कामाच्या माध्यमातून

80 labor organization | ८० मजूर संस्था मालामाल

८० मजूर संस्था मालामाल

Next

चंद्रपूर : जिल्ह्यातील ८० मजूर सहकारी संस्थांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे २७० कामे वाटप करण्यात आले. या कामांची किमंत २२ कोटी रुपयांच्या घरात असून या कामाच्या माध्यमातून संस्था सदस्य मालामाल झाले आहेत.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात विविध सहकारी संस्थाची नोंदणी केली जाते. यात मजूर संस्था म्हणून ९४ संस्था कार्यरत आहेत. मजूर संस्थाना काम मिळवून देण्याचे काम हे जिल्हा मजूर फेडरेशनचे असते. संस्था मजूर फेडरेशनकडे कामाची मागणी करीत असतात. काम वाटप समितीच्या माध्यमातून कामे वाटप केली जातात. या समितीत जिल्हा उपनिबंधक अध्यक्ष असतात. तसेच बांधकाम विभाग व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांचा समितीत समावेश असते.
संस्थाची पात्रता व वर्गीकरणाच्या आधारे संस्थेला काम देण्यात येते. यात अ वर्गीकरणात असलेल्या संस्थेला १५ लाखापर्यंतचे काम तर ब वर्गीकरणात असलेल्या संस्थेला साडेसात लाखापर्यंतचे काम मिळतात. दोन्ही वर्गीकरणातील संस्थाना ५० लाखांपर्यतची कामे करता येतात.
३१ डिसेंबर २०१४ पर्यंत ज्या संस्थानी कामाची मागणी केली अशा संस्थांच्या वर्गीकरणाच्या आधारे ९४ संस्थापैकी ८० संस्थाना २७० कामांचे वाटप करण्यात आले आहे. या कामांची किमंत २२ कोटी ५२ लाख २१ हजार एवढी आहे. तर १४ संस्था वर्गीकरणात न बसल्याने या संस्थाना कामे नाकारण्यात आली आहेत.
संस्थांना कामे मिळाल्याने सदस्यांना कामे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात मिटला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 80 labor organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.