मूल नगरपरिषदेचा ८० टक्के पाणीपट्टी कर थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:28 AM2021-03-10T04:28:56+5:302021-03-10T04:28:56+5:30

भोजराज गोवर्धन मूल : चार हजार नळ कनेक्शनच्या मदतीने सुमारे ४० लाख लिटर पाण्याने मूल शहरातील जनतेची पाण्याची तहान ...

80% water bill of Mul Nagar Parishad is exhausted | मूल नगरपरिषदेचा ८० टक्के पाणीपट्टी कर थकीत

मूल नगरपरिषदेचा ८० टक्के पाणीपट्टी कर थकीत

Next

भोजराज गोवर्धन

मूल

: चार हजार नळ कनेक्शनच्या मदतीने सुमारे ४० लाख लिटर पाण्याने मूल शहरातील जनतेची पाण्याची तहान नगरपालिका भागवत आहे. मात्र पाणीपट्टी कर भरण्यास नळधारकात उदासीनता आहे. ८० टक्के पाणीकर अजूनही थकीत आहे. परिणामी नगरपरिषद कर वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्याचा पवित्र्यात आहे. प्रसंगी नळ कनेक्शनही कापण्याचे संकेत दिले आहेत.

मूल नगरपालिका क्षेत्रात ४ हजार १६७ नळधारक आहेत. मूल शहरातील आठवडी बाजारातील दोन, तहसील कार्यालयाजवळील एक आणि मोजेस लेआऊटमधील एक अशा चार पाण्याच्या टाकींमधून सुमारे ४० लाख लिटर पाण्याचा पुरवठा रोज मूलमधील नागरिकांना केला जातो. यासाठी वर्षाकाळी नळधारकांकडून ५० लाख रूपये पाणीपट्टी कर वसूल करण्याचे उद्दिष्ट नगरपालिकेचे आहे. मात्र यावर्षी केवळ २० टक्के नळधारकांनी पाणीपट्टी कर जमा केला आहे. ८० टक्के नळधारकांनी अजूनही पाणीपट्टी कराचा भरणा केलेला नाही. यामुळे नगरपालिकेने वसुली मोहीम हाती घेतली आहे.

पाणी पुरवठ्यासाठी अडीच कोटींचा खर्च

मूल शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे अडीच कोटी रूपये वर्षाकाठी नगरपालिकेला खर्च येतो. या तुलनेत नळधारकांकडून पाणीपट्टी कर वसुली अतिशय कमी आहे. असे असतानाही नळधारक पाणीपट्टी कर भरण्यास उदासीनता दाखवित असल्यामुळे वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी पाणीपट्टी कर भरून नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मूल नगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता श्रीकांत समर्थ, लिपिक विनोद येनूरकर यांनी केले आहे.

Web Title: 80% water bill of Mul Nagar Parishad is exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.