महाआरोग्य शिबिरात ८०० रुग्णांची तपासणी
By admin | Published: January 26, 2016 12:45 AM2016-01-26T00:45:35+5:302016-01-26T00:45:35+5:30
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना तालुका वरोरा व आचार्य विनोबा भावे ग्रामीण ...
वरोरा : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना तालुका वरोरा व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या सयुक्त विद्यमाने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ८०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ६१ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा जनाबाई पिंपळशेंडे, न.प. उपाध्यक्षा शकीला पठाण, नगरसेवक पुरुषोत्तम खिरटकर, राजु महाजन, जि.प. सदस्य नितीन मत्ते, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, पं.स. सदस्य अविनाश ढेंगळे, आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे एन.पी. शिंगणे, डॉ. सागर गौरकार, डॉ. श्रीरंग बुरचुंडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक जी.डब्ल्यू. भगत, डॉ. सागर वझे, शिवसेना तालुका प्रमुख विशाल बदखल, भास्कर ताजने, दत्ता बोरेकर, लक्ष्मण गमे, रुग्ण कल्याण समिती सदस्य सुभाष दांदडे, खेमराज कुरेकार, लोकेश पांढरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी संदीप पारखी, अश्विनी पारखी, पुर्वा वैद्य, अश्वीनी उपाध्ये, रूचिका पिजदूरकर, वैष्णवी कातोरे, रूपेश आवारी, श्रुती विरमलवार, अदिती पिंपळकर, सुरभी विधाते, अनिकेत उमरे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य शिबिरात शहरासोबतच ग्रामीण भागातील पुरुष व महिला सहभागी झाल्या होत्या. आरोग्य शिबिराचे हे तीसरे वर्ष असून यापुर्वी झालेल्या आरोग्य शिबिरात अनेक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या, हे विशेष. शिबिराला शिवसेना शहर प्रमुख निलेश भालेराव, स्वप्नील देवाळकर, फिरोज सट्टीकोट, काशीफ खान यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)