तस्करीतील ८२ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:45+5:302021-06-02T04:21:45+5:30

नागभीड मूल मार्गे जनावरांची अवैध तस्करी तेलंगणाकडे होत असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. त्यांनी ...

82 animals released from smuggling | तस्करीतील ८२ जनावरांची सुटका

तस्करीतील ८२ जनावरांची सुटका

googlenewsNext

नागभीड मूल मार्गे जनावरांची अवैध तस्करी तेलंगणाकडे होत असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. त्यांनी लगेच मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांना माहिती दिली. त्यानी दोन पथके गठित करून मूल चार्मोशी व सिंदेवाही परिसरात नाकाबंदी केली. दरम्यान, चार्मोशी नाका मूल येथे एमएच ४० बीएल ८६५२ या ट्रकमध्ये २३ जनावरे आढळून आली. पोलिसांनी सर्व १२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मोहम्मद तौसीफ अ. मतीन शेख याला अटक केली. पोलिसांनी एका ट्रकवर कारवाई केल्याची माहिती इतर दोन्ही ट्रकचालकाला मिळताच त्यानी ट्रक वळवून नागभीडकडे पळ काढला. दरम्यान, दुसऱ्या पथकाला सिंदेवाही येथील शिवाजी चौकात नाकाबंदी केली. मात्र ट्रकचालक विरुद्ध दिशेने ट्रक पळवून नागभीडकडे पळाला. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला तसेच नागभीड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी टी-पाॅईंट नागभीड येथे नाकाबंदी करून विना नंबरच्या आयशर ट्रकमधून २३ जनावरांची सुटका केली. या कारवाईत २७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ट्रकचालकास ताब्यात घेतले. दरम्यान, नागभीड-तुकूम गावातून गोसीखुर्द कॅनलच्या रोडवर ट्रक क्र. एमएच ३६ एफ ३२८९ या ट्रकमधून ३६ जनावरांची सुटका करून शाहीद हुसेन, ताहीर मतीन शेख व अन्य दोन जणांवर नागभीड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अतुल कलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक माणिक कुमरे, तानू रायपूरे, वाल्मीक मेश्राम, महेश पतरंगे, नरेंद्र अंडेलकर, प्रभाकर गेडाम, विजय जीवतोडे यांनी केली.

Web Title: 82 animals released from smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.