२४ तासात ८२ कोरोना रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:25 AM2020-12-23T04:25:29+5:302020-12-23T04:25:29+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१ हजार ९५१ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २० हजार ९२४ ...
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१ हजार ९५१ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २० हजार ९२४ झाली आहे. सध्या ६७१ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६५ हजार ७५५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ४१ हजार ७०१ नमुने निगेटिव्ह आले. मृत झालेल्यांमध्ये राजोरी ता. मूल येथील ८० वर्षीय पुरूष, चिमूर पडाळा येथील ७५ वर्षीय पुरूष व कमवीर वार्ड ता. वरोरा येथील ६५ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३५६ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३२९, तेलंगणा व बुलडाणा प्रत्येकी एक, गडचिरोली १६, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
तालुकानिहाय रूग्ण
मंगळवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या ८२ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ११, चंद्रपूर तालूका १२, बल्लारपूर आठ, भद्रावती १२, ब्रम्हपुरी तीन, मूल नऊ, गोंडपिपरी दोन, राजूरा दोन, चिमूर आठ, वरोरा नऊ व इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.