८३ हजार कोरोनामुक्त; १४ नवीन रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:30 AM2021-07-30T04:30:43+5:302021-07-30T04:30:43+5:30
बाधित आढळलेल्या १४ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रात ४, चंद्रपूर तालुका २, बल्लारपूर २, भद्रावती १, मूल १, सावली १, ...
बाधित आढळलेल्या १४ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रात ४, चंद्रपूर तालुका २, बल्लारपूर २, भद्रावती १, मूल १, सावली १, राजूरा १, वरोरा १ व अन्य ठिकाणतील एका रुग्णाचा समावेश आहे. ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, कोरपना, जिवती, पोंभूर्णा व गोंडपिपरी तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. बाधितांची संख्या ८५ हजार ५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार ४०२ झाली आहे. सध्या ६८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख १३ हजार ८२७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख २५ हजार ४४६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १५३४ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करून जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.