८७१ शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग आणि शाळेचे व्यवस्थापन एकाच खोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:29 AM2021-02-24T04:29:55+5:302021-02-24T04:29:55+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे १५४० शाळा आहेत. शाळेमध्ये प्रशस्त खोली, शौचालय, मुख्याध्यापक कक्ष, प्रसाधन गृह, क्रीडांगण आदी सुविधा ...

In 871 schools, student classes and school management are in one room | ८७१ शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग आणि शाळेचे व्यवस्थापन एकाच खोलीत

८७१ शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग आणि शाळेचे व्यवस्थापन एकाच खोलीत

Next

चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे १५४० शाळा आहेत. शाळेमध्ये प्रशस्त खोली, शौचालय, मुख्याध्यापक कक्ष, प्रसाधन गृह, क्रीडांगण आदी सुविधा असण्याचे निकष आहे. परंतु, आताही अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधा नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ६६९ शाळांमध्ये मुख्याध्यापक कक्ष आहे. तर ८७१ कार्यालयामध्ये असे कोणतेही कक्ष नाही. त्यामुळे ज्या शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा पदभार आहे. ते शिक्षक ज्या वर्गाला शिकवतात, तोच वर्ग त्यांचे कार्यालय, असे मानून कामकाज होत असते. त्यामुळे बऱ्याचदा अडचण भासत असते. शैक्षणिक सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना मुख्याध्यापक कक्षाकडे दुर्लक्ष होऊ नये, अशा प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी दिल्या.

बॉक्स

शाळांमध्ये अडचणींचा डोंगर

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये विविध समस्या आहेत. अनेक शाळांमधील वर्ग खोल्यांची उणीव आहे. ग्रामीण भागात नेटवर्क राहत नसल्याने संगणकीय शैक्षणिक साहित्याद्वारे शिकवणी करण्यास अडचण जात आहे. फर्निचर नसल्याने दस्तावेज, शाळेचे विविध साहित्य, फाईल्स एका वर्ग खोलीच्या कोपऱ्याला ठेवावे लागत आहे.

------

जिल्ह्यातील एकूण शाळा - १५४०

मुख्याध्यापक कक्ष नसलेल्या शाळा ६६९

बॉक्स

मुख्याध्यापक कक्ष नसलेल्या शाळांची संख्या

बल्लारपूर ८

भद्रावती ९५

ब्रह्मपुरी ७६

चंद्रपूर ५५

चिमूर ३७

गोंडपिपरी ५९

जिवती ८०

कोरपना २४

मूल ५०

नागभीड ३९

पोंभुर्णा ४०

राजुरा ९४

सावली ६२

सिंदेवाही ६०

वरोरा ९२

Web Title: In 871 schools, student classes and school management are in one room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.