८७ हजार ५०० फूट जमीन वक्फ बोर्डाची नसून खासगी मालकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:14+5:302021-06-06T04:21:14+5:30

राजुरा : राजुरा तालुका पूर्वी निजामशाहीमध्ये होता. त्यामुळे शहरात अनेक जमिनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या होत्या. कालांतराने तेथे वस्त्या निर्माण ...

87,500 feet of land is not owned by Waqf Board but privately owned | ८७ हजार ५०० फूट जमीन वक्फ बोर्डाची नसून खासगी मालकीची

८७ हजार ५०० फूट जमीन वक्फ बोर्डाची नसून खासगी मालकीची

Next

राजुरा : राजुरा तालुका पूर्वी निजामशाहीमध्ये होता. त्यामुळे शहरात अनेक जमिनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या होत्या. कालांतराने तेथे वस्त्या निर्माण झाल्या; परंतु जागा मात्र त्याच होत्या. राजुरा शहरातील चुनाभट्टी वाॅर्डातील ८७ हजार ५०० फूट जागेचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. वक्फ बोर्ड म्हणते आमची जागा आहे आणि विभावरी देशपांडे म्हणतात आमची जागा. दरम्यान, कोर्टाने गेल्या १९९४, २०१६ मध्ये विभावरी देशपांडे यांच्या बाजूने निकाल दिला. सुप्रीम कोर्टानेही वक्फ बोर्डाची याचिका फेटाळून लावली.

आता त्यानंतर सातबारावर मालकी हक्क देशपांडे यांचा आहे आणि नगर परिषद राजुराच्या रेकाॅर्डला ८७ हजार ५०० फूट जागा विभावरी देशपांडे यांच्या नावे नोंद आहे. याची काही जागा अतिक्रमण असून, त्यावर भंगार व्यापारी वक्फ बोर्डाचे नाव घेऊन किरायाने असल्याचे सांगत आहे. मात्र, सदर जमीन नगर परिषद रेकॉर्डनुसार आणि तहसील कार्यालय सातबारानुसार देशपांडे यांच्या मालकीची आहे, असे विभावरी देशपांडेंतर्फे विलास देशपांडे यांनी सांगितले आहे.

Web Title: 87,500 feet of land is not owned by Waqf Board but privately owned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.