शहरातील विविध प्रभागात लावणार जैवविविधतेचे ९७ हजार वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 10:32 PM2018-07-07T22:32:42+5:302018-07-07T22:33:01+5:30

महानगरपालिकेच्या वतीने १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत विविध प्रभागात ९७ हजार वृक्षलागवड केली जात आहे़ या वृक्षांमध्ये विविध वनस्पतींचा समावेश असल्याने जैवविविधतेला चालना मिळणार आहे़

9 7 thousand trees of biodiversity in different parts of the city | शहरातील विविध प्रभागात लावणार जैवविविधतेचे ९७ हजार वृक्ष

शहरातील विविध प्रभागात लावणार जैवविविधतेचे ९७ हजार वृक्ष

Next
ठळक मुद्देमनपाचा उपक्रम : विविध संघटनांचा सहभाग

चंद्रपूर : महानगरपालिकेच्या वतीने १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत विविध प्रभागात ९७ हजार वृक्षलागवड केली जात आहे़ या वृक्षांमध्ये विविध वनस्पतींचा समावेश असल्याने जैवविविधतेला चालना मिळणार आहे़
मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी वृक्षलागवड करून संगोपन करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. आपापल्या प्रभागातील नगरसेवकांच्या हस्ते वृक्षारोपण केले जात आहे. वडगाव प्रभाग विवेकानंद नगर खुल्या जागेत १५० तर मुस्तफा कॉलनीत १०० वृक्ष वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया, माजी सभापती देवानंद वाढई, उपायुक्त गोस्वामी, सहायक आयुक्त सरनाईक, प्रभाग अधिकारी सोनटक्के, सोमेश्वर पडगेलवार, अ‍ॅड पारशीवे, वास्तुविशारद पंडित, संजय ढिमोले, प्रभाग शिपाई व कामगार उपस्थित होते.
बाबुपेठ प्रभागातील महाकाली कॉलरी प्राथमिक शाळा व सरोजिनी प्राथमिक शाळेत नगरसेवक पितांबर कश्यप व नगरसेविका ललिता राजेश रेवल्लीवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रभागात आतापर्यंत १०० झाडे लावण्यात आली.
कनिष्ठ अभियंता अतुल भसारकर, स्वच्छता निरीक्षक अनिरुद्ध राजूरकर, मधुकर मासबोईनवार, कुरेशी आदी उपस्थित होते. एकोरी प्रभागातील नेहरु शाळा व दारुबंदी कार्यालय परिसरात पार पडलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात नगरसेवक दीपक जयस्वाल, अशोक नागापुरे आदी उपस्थित होते. दे. गो. तुकूम शाळा पटांगण परिसरात माया उईके, सदस्य शिला चव्हाण यांनी वृक्षारोपण केले.
याशिवाय शहरातील शास्त्रीनगर प्रभाग छत्रपतीनगर, टागोर शाळा, अभ्यंकर शाळा, माळी समाज मैदान, इंडस्ट्रियल स्टेडियम व वर्धा व्हॅली इंग्लिश हायस्कूल परिसरातही वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सहायक आयुक्त सचिन पाटील, नगरसेवक कारांगल, चैतन्य चोरे व नागरिक उपस्थित होते.

Web Title: 9 7 thousand trees of biodiversity in different parts of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.