डिझेल टँकर व ट्रकचा भीषण अपघात! वाहनांनी घेतला पेट, ९ जणांचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 11:03 AM2022-05-20T11:03:23+5:302022-05-20T11:46:18+5:30

अजयपूरजवळ या दोन्ही वाहनांची धडक झाली. यावेळी एका वाहनात लाकूड व दुसऱ्या वाहनात डिझेल असल्याने जोरदार भडका उडाला. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांतील २ चालक व ७ मजूर अशा ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

9 people died as diesel tanker and truck loaded with woods collision and fire breaks out | डिझेल टँकर व ट्रकचा भीषण अपघात! वाहनांनी घेतला पेट, ९ जणांचा होरपळून मृत्यू

डिझेल टँकर व ट्रकचा भीषण अपघात! वाहनांनी घेतला पेट, ९ जणांचा होरपळून मृत्यू

googlenewsNext

चंद्रपूर : मूल मार्गावरील अजयपूरजवळील रिव्हरव्ह्यूजवळ येथे लाकडांनी भरलेला ट्रक व डिझेल टँकर समोरासमोर धडकले. या अपघातानंतर भीषण आग लागून दोन्ही वाहनांतील चालकांसह ७ मजुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा अपघात गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मूलमार्गावरील अजयपूर गावाजवळ घडला.

प्राप्त माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास लाकूड भरलेला ट्रक चंद्रपूरच्या दिशेने जात होते. तर, डिझेल भरलेला एक टँकर चंद्रपूरकडून येत होता. दरम्यान, अजयपूरजवळ या दोन्ही वाहनांची धडक होऊन आग लागली. यावेळी एका वाहनात लाकूड व दुसऱ्या वाहनात डिझेल असल्याने जोरदार भडका उडाला. यावेळी लाकडू असलेल्या वाहनातील चालकासह ६ मजूर, डिझेल असलेल्या वाहनातील तिघेजण अशा एकूण ९ जणांंचा होरपळून मृत्यू झाला. 

चालक अक्षय सुधाकर डोंगरे (३०) बीटीएस प्लॉट बल्लारशा, मजूर प्रशांत मनोहर नगराळे (२८), कालू प्रल्हाद टिपले (३५), मैपाल आनंदराव मडचापे (२४),बाळकृष्ण तुकाराम तेलंग (४०),साईनाथ बापूजी कोडापे (३५), संदीप रवींद्र आत्राम (२२) सर्व राहणार दहेली व टँकरचालक हाफिज खान (३८) अमरावती, मजूर संजय पाटील (३५) वर्धा अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

या अपघातामुळे संपूर्ण रस्ताभर आग पसरल्याने मूल व चंद्रपूर मार्गावरील वाहतूक खंडित झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तसेच, चंद्रपूर,बल्लारशा, सीटीपीएस चंद्रपूर, पोंभूर्णा, मुल येथून अग्निशमन वाहन बोलाविण्यात आले. आग आटोक्यात आली असली तरी आज सकाळी ९ वाजेपर्यंत टँकर जळतच होता. सकाळीच अग्निशमन गाडीने पुन्हा आग विझवण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून सर्व जळालेले मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहेत.

Web Title: 9 people died as diesel tanker and truck loaded with woods collision and fire breaks out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.