वरोरा येथे नऊ जणांना दंड

By Admin | Published: June 25, 2017 12:36 AM2017-06-25T00:36:38+5:302017-06-25T00:36:38+5:30

शहरात स्वच्छ भारत अभियान मोहीम नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असून जनजागृती करणे सुरू केले आहे.

9 people in Worora jail | वरोरा येथे नऊ जणांना दंड

वरोरा येथे नऊ जणांना दंड

googlenewsNext

स्वच्छ भारत अभियान : गुडमॉर्निंग पथकाची कार्यवाही
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : शहरात स्वच्छ भारत अभियान मोहीम नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असून जनजागृती करणे सुरू केले आहे. तरीही नागरिक उघड्यावर शौचासाठी जात आहे. गुरूवारी पहाटे न.प. वरोराच्या गुडमॉर्निंग पथकाने नऊ व्यक्तीवर कार्यवाही करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
वरोरा शहर स्वच्छ व हागणदारीमुक्त होण्याकरिता मागील काही महिन्यांपासून स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. ‘मागेल त्याला शौचालय’ बांधण्याकरिता निधी तत्काळ उपलब्ध करून दिला जात आहे.
सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवण्यावर पालिका प्रशासन भर देत आहे. उघड्यावर शौचालयास जावू नये, याकरिता न.प. प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या कार्यवाहीत मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदवशी, मुख्य लिपीक डॉ. प्रकाश कोटेचा, आरोग्य निरीक्षक भूषण सालवटकर, उमेश ब्राह्मणे आदी न.प. कर्मचारी सहभागी झाले.

पहाटे ५ वाजतापासून कार्यवाही
उघड्यावर शौचास जावू नये, याकरिता वरोरा पालिकेच्या वतीने नऊ गुडमॉर्निंग पथक स्थापन करण्यात आले आहेत. २३ जून रोजी पहाटे ५ वाजता गुडमार्निंग पथकाने उघड्यावर शौचालयास जाणाऱ्या नऊ व्यक्तीला पकडून त्यांच्याकडून ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.यापूर्वी झालेल्या कार्यवाहीपेक्षा ५०० रुपये दंड अधिक असल्याने आता तरी नागरिक उघड्यावर शौचास जाणार नाहीत, असे मानले जात आहे.

नगर परिषदेच्या गुडमॉर्निंग पथकाची कार्यवाही सातत्याने चालू राहणार असून उघड्यावर शौचास जाणाऱ्या व्यक्तींना यापुढे पोलिसांच्या ताब्यातही दिले जाणार आहे. ज्यांनी शौचालयाचे अनुदान घेवून बांधकाम केले नाही, त्यांना अंतिम संधी दिली जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही केली जाणार आहे.
- सुनील बल्लाळ,
मुख्याधिकारी, न.प. वरोरा

Web Title: 9 people in Worora jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.