तरुण-तरुणींना व्यावसायिक पायलट होण्याची संधी राज्य शासनाकडून ९० टक्के अनुदान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 01:22 PM2024-08-23T13:22:23+5:302024-08-23T13:24:33+5:30
Chandrapur : अर्ज सादर करण्यासाठी आज शेवटची तारीख
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागपूर फ्लाइंग क्लबअंतर्गत चंद्रपूर फ्लाइंग स्टेशन समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील १२ वी उत्तीर्ण (गणित व भौतिकशास्त्र या विषयासह) झालेल्या १० विद्यार्थ्यांना व्यावसायिक पायलट परवाना (कर्मशिअल पायलट लायसन्स) प्रशिक्षणाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. या प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीना राज्य शासनाकडून ९० टक्के अनुदान (अंदाजे ३७ लक्ष) रुपये प्राप्त होणार असून, उर्वरित १० टक्के रक्कम निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतः भरावयाची आहे. अर्ज सादर करण्यासाठी शुक्रवार, दि. २३ ऑगस्ट शेवटची तारीख आहे. त्यानंतर लेखी परीक्षा होणार असून परीक्षा संपल्यानंतर, जिल्हा समितीद्वारे कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यास एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
ही लागणार कागदपत्रे महाराष्ट्र राज्याचे विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील डोमीसाइल (अधिवास) प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, १० वी व १२ वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व मार्कशीट, मुख्याध्यापक, शाळेचे प्राचार्य, राजपत्रित अधिकाऱ्यांनी दिलेले चारित्र्याचे प्रमाणपत्र, चंद्रपूर जिल्ह्याचे स्थानिक रहिवासी असल्याबाबतचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाकरिता जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे.
असे आहे निषक उमेदवार महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असावा, उमेदवाराची वयोमर्यादा किमान १८ वर्षे ते २८ वर्षे असावी, १२ वी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित हे विषय घेऊन अनुसूचित जमातीकरिता किमान ६५ टक्के गुणांसह व अमागासकरिता किमान ७५ टक्के गुणांसह प्राप्त करून पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेला, झालेली उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार आहे.