अखेर ९८ दारू परवाने मंजूर, ‘सोम’वारी ठरणार मुहुर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:19 AM2021-07-04T04:19:55+5:302021-07-04T04:19:55+5:30
जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने ८ जून २०२१ रोजी अधिसूचना जारी केली. ११ जून २०२१ रोजी राज्य उत्पादन ...
जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने ८ जून २०२१ रोजी अधिसूचना जारी केली. ११ जून २०२१ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना केल्या. दारूविक्री परवानासाठी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, चंद्रपूर यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या १२६ अर्जांपैकी १२४ अर्जांची संबंधित यंत्रणेने पडताळणी पूर्ण केली. मोका चौकशीनंतर त्रुटी आढळल्याने काही परवाने प्रलंबित ठेवली होती. अटींची पूर्तता झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ९८ दारूविक्री परवान्यांना शुक्रवारी अंतिम मंजुरी दिली. अटी व नियमांची १०० टक्के पूर्तता करणाऱ्या ९८ परवान्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम शिक्कामोर्तब केले. शनिवारी हे परवाने जिल्ह्यातील दारूविक्रेत्यांना जारी करण्यात आले. सोमवारी दारूविक्रीच्या मुहूर्ताची घोषणा होणार आहे.
सोमवारी पुन्हा ५० परवाने जारी
दारूविक्री परवानासाठी अर्ज केलेल्या बऱ्याच प्रकरणात जागेचा वाद होता. थकीत कर व अन्य निकषांतही हे अर्ज अडकले. मात्र, त्रुटी पूर्ण करण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा ५० परवाने मंजूर झाले. प्रशासनाने हे परवाने शनिवारी उशिरापर्यंत विक्रेत्यांना दिले नाही. सोमवारी हे परवाने वितरण केले जाणार आहेत.
वितरित झालेले दारू परवाने
६४ परमिट रूम, १ वाईन शॉप, २६ देशी दारू, ६ बियर शॉपी, १ क्लब