गडचांदूर बसस्थानकासमोर दुकानात चक्क ‘बॉम्ब’ ? बॉम्बशोधक पथक घटनास्थळी, परिसरात तगडा बंदोबस्त

By राजेश भोजेकर | Published: July 30, 2024 05:01 PM2024-07-30T17:01:11+5:302024-07-30T17:08:13+5:30

Chandrapur : गडचिरोली पोलिस दलाचे बॉम्ब विरोधी पथकाला पाचारण

A 'bomb' in the shop in front of Gadchandur bus station? | गडचांदूर बसस्थानकासमोर दुकानात चक्क ‘बॉम्ब’ ? बॉम्बशोधक पथक घटनास्थळी, परिसरात तगडा बंदोबस्त

A 'bomb' in the shop in front of Gadchandur bus station?

चंद्रपूर: कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील बसस्थानकासमोरील भगवती कलेक्शन समोर जिवंत बॉम्ब आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बाॅम्ब असल्याची माहिती गडचांदूर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान गडचांदूर पोलिस व बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल होत बॉम्ब सदृश्य बॅगची तपासणी सुरू केली आहे. गडचिरोली पोलिस दलाचे बॉम्बविरोधी पथक गडचांदूरसाठी रवाना झाले आहे. 

 

मंगळवारी दुपारी २.५० वाजताच्या सुमारास बसस्थानक परिसरात असलेल्या भगती कलेक्शन समाेर एका बँगेत दोन वायर जोडलेले जिवंत बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली. बॉम्ब असल्याची वार्ता गडचांदूर शहरात पसरताच नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तगडा पोलिस बंदोबस्तासह बॉम्बशेधक पथक घटनास्थळी दाखल झाले. बॉम्बची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान बॉम्ब निकामी करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाचे बॉम्बविरोधी पथक गडचांदूरकडे रवाना झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान ही बॉम्ब सदृश्य बॅग कोण ठेवली याचा कसून शोध गडचांदूर पोलिस घेत आहे. वृत्तलिहेतोवर बॉम्ब निकामी करण्यात आला नव्हता.

 

यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना विचारले असता दुकानात दोन पिशव्या मिळाल्या. त्यात संशयास्पद वस्तू आहे. बॉम्ब असल्याची चर्चा आहे. संबंधित दुकानदाराला बॉम्ब असल्याचा फोन देखील आला होता. त्यामुळे गडचिरोली येथून बॉम्ब निकामी करणारे पथक पाचारण केले आहे. हे पथकच संबंधित वस्तू बॉम्ब आहे की अन्य काही हे सांगू शकेल. बॉम्ब असल्याची चर्चा गावात वाऱ्यासारखी पसरल्याने लोकांनी गर्दी केली आहे. लोकांनी शांत राहावे असेही आवाहन पोलिस अधीक्षक यांनी केले आहे.

Web Title: A 'bomb' in the shop in front of Gadchandur bus station?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.