वरोरा शहरात डायरियाने एका बालकाचा मृत्यू
By राजेश भोजेकर | Published: July 6, 2024 12:35 PM2024-07-06T12:35:51+5:302024-07-06T12:39:01+5:30
Chandrapur : चार जणांवर उपचार सुरू
चंद्रपूर : वरोरा शहरातील मालवीय प्रभागात मागील काही दिवसापासून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. हे पाणी पिल्यामुळे डायऱीयाची लागण सुरू झाली. यातून चार वर्षीय मुलाला डायरियाची लागण झाली. शुक्रवारी रात्री 11 प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्याकरिता नेताना वाटेतच मृत्यू झाला. पूर्वेश सुभाष वांढरे (4) असे मृतकाचे नाव आहे.
मालवीय प्रभागात वरोरा नगर परिषदेच्या वतीने नळाद्वारे पिण्याचे पाणी नागरिकांना दिले जाते. मालवीय प्रभागातील स्मशानभूमी जवळ नळाच्या पाण्याचा व्हॉल्व लिक आहे. त्याची अनेक दिवसापासून स्वच्छता करण्यात आली नाही. नळ्याच्या व्हॉल्व लिकमधून नालीचे पाणी गेल्यामुळे डायरियाची लागण झाल्याचा आरोप नागरिक करीत आहे. डायरिया झालेल्यांमध्ये प्रतीक्षा सुभाष वाढरे (35), शोभा नारायण वांढरे (55), ओम प्रशांत बुरटकर (12), सौंदर्य प्रशांत बुरटकर (15) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर पूर्वेश सुभाष वांढरे (4) याचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला.