वाघोली बुटी येथील महिलेला मारणारी मादी बिबट व तिचे बछडे जेरबंद

By परिमल डोहणे | Published: May 21, 2023 08:39 PM2023-05-21T20:39:14+5:302023-05-21T20:39:47+5:30

अनेक दिवसांपासून सुरू होता धुमाकूळ

A female leopard that killed a woman in Wagholi Buti and her cubs were imprisoned | वाघोली बुटी येथील महिलेला मारणारी मादी बिबट व तिचे बछडे जेरबंद

वाघोली बुटी येथील महिलेला मारणारी मादी बिबट व तिचे बछडे जेरबंद

googlenewsNext

चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपवनपरिक्षेत्रातील सामदा बूज वन बीटमध्ये येणाऱ्या वाघोली बुटी शिवारात शनिवारी बिबट्याने हल्ला करून एका महिलेला ठार केल्याची घटना घडली होती. त्याच रात्री वन विभागाने त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वैनगंगा नदीकाठावरील डॉ. रूढे यांच्या फार्महाऊसजवळ शंभर मीटर अंतरावर पिंजरे लावून ठेवले असता, रात्रीच्या सुमारास हल्लेखोर मादी बिबट व तिचे दोन बछडे जेरबंद झाले.

विशेष म्हणजे, वाघोली बुटी परिसरात वाघ व बिबट्याने महिनाभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. २० दिवसांपूर्वी याच परिसरात वाघाने ममता बोदलकर या महिलेला ठार केले होते. तर शनिवारी वाघोली बुटी येथील प्रेमिला रोहणकर या शनिवारी शेतात काम करण्यासाठी गेल्या असताना याच मादी बिबट्याने तिच्यावर हल्ला करून ठार केले. या घटनेनंतर शेतात काम करणारे ५० ते ६० जण धावत आले. त्यांनी बिबट्याला पळविण्याचा प्रयत्न केला.

काही वेळाने बिबट्याने धूम ठोकली. विशेष म्हणजे, घटनेनंतर माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी वाघोली बुटी येथे जाऊन रोहणकर कुटुंबियांची भेट घेत बिबट्याला पकडण्याची सूचना वन अधिकाऱ्यांना दिली होती. शनिवारी रात्रीच वन विभागाने त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वैनगंगा नदीकाठावरील डॉ. रूढे यांच्या फार्महाऊसजवळ शंभर मीटर अंतरावर पिंजरे लावून ठेवले होते. रात्रीच्या सुमारास हल्लेखोर मादी बिबट व तिचे दोन बछडे पिंजऱ्यात जेरबंद झाले.

वाघोली बुटी परिसरातून मादी बिबट व तिचे दोन बछडे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहेत. मादी बिबट व तिच्या बछड्यांना चंद्रपूर वन विभागाच्या पथकाने शनिवारी रात्रीच चंद्रपूरला नेले आहे.
- एस. के. सूर्यवंशी, क्षेत्र सहायक, व्याहाड खुर्द उपवनक्षेत्र

Web Title: A female leopard that killed a woman in Wagholi Buti and her cubs were imprisoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.