दोन बछड्यांसह मादी बिबट गावात घुसले, सहा जणांना केले जखमी; एका घरात मांडले ठाण
By राजेश भोजेकर | Published: July 19, 2024 11:23 AM2024-07-19T11:23:57+5:302024-07-19T11:25:07+5:30
सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी येथे सकाळी ६ वाजतापासून थरार : रेस्क्यूसाठी वनविभागाचे शार्प शूटर दाखल
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी येथे दोन बछड्यांसह आलेल्या मादी बिबट्याने कहर केला. ही मादी बिबट बछड्यांसह शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गावात शिरले. या तिघांनीही चांगला धुमाकूळ घातला. यामध्ये सहा जणांना जखमी करून गावातील शानबा बारेकर यांच्या घरात आश्रय घेतला आहे. ही बाब माहिती होताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. वन विभागाचे अधिकारी दडून असलेल्या मादी बिबट व तिच्या बछड्यांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सिंदेवाही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
जखमींमध्ये विजय देवगरीकर व इतर पाच जणांचा समावेश आहे. जखमींना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतरांची नावे मात्र कळू शकली नाही. सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी येथे सकाळी अचानक एक बिबट दोन बछड्यांसह गावात शिरले. या बिबट्यांनी त्यांच्या वाटेत आलेल्या पाच जणांना जखमी केले. यानंतर मादी बिबट्याने बछड्यांना घेऊन गावातीलच शानबा बारेकर यांच्या घरात आश्रय घेतला. घटनास्थळी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या बछड्यांसह असलेल्या मादी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी शार्प शूटर बोलण्यात आले आहे. घटनास्थळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सिंदेवाही पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अद्यापही बिबट आणि तिच्या बछड्यांना रेस्क्यू करण्यात यश आले नसल्याची माहिती आहे.
सर्व जखमींची नावे (रा. मोहाळी)
1) विजय देवगीरकर (35)
2) मनोहर दांडेकर (50)
3) जितेंद्र दांडेकर (30)
4) सुभाष दांडेकर (25)
5) ऋतिक वाघमारे 18)
6) पांडुरंग नन्नावरे (32)