चंद्रपुरात श्रीगणेशाच्या विसर्जनासाठी दीड हजार पोलिसांची फौज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 01:48 PM2024-09-18T13:48:46+5:302024-09-18T13:49:35+5:30
तगडा बंदोबस्त : चौकाचौकात राहणार तैनात
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लाडक्या बाप्पाला अनंत चतुर्दशीला निरोप देण्यात येणार आहे. चंद्रपूर पोलिसांकडून उत्सवाच्या कालावधीत शहरात कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून, दीड हजारांवर पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यात पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक यांच्यासह सहा उपविभागीय पोलिस अधिकारी, २२ पोलिस निरीक्षक, ८० सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, ८०० पोलिस कर्मचारी व एक हजार होमगार्ड यांचा समावेश आहे.
उत्सवाच्या काळात संभाव्य घातपाती कारवाया, अनुचित घटनांचा धोका विचारात घेऊन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली आहे. विसर्जनावेळी शहरातील मध्यभागात होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. भाविकांचे मोबाइल, दागिने चोरी, तसेच अनुचित प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस कार्यरत असणार आहेत. विसर्जनासाठी दोन हजार पोलिस अधिकारी-कर्मचारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, बाहेरगावाहून मागविण्यात आलेले पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्यांचा बंदोबस्तामध्ये समावेश आहे.
राज्य राखीव दलाची तुकडी तैनात
विसर्जनासाठी दोन हजार पोलिस अधिकारी-कर्मचारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, बाहेरगावाहून मागविण्यात आलेले पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्यांचा बंदोबस्तामध्ये समावेश आहे. यासोबतच पोलिस मित्रही राहणार आहे
इरई नदीच्या कुंडात होणार विसर्जन
चंद्रपूर शहर मनपाने इरई नदीच्या पात्रात विसर्जन कुंड तयार केले आहे. येथे सार्वजनिक गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. तसे नियोजन केले आहे.
१५०० पोलिसांची फौज
पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक यांच्यासह सहा उपविभागीय पोलिस अधिकारी, २२ पीआय, ८० एपीआय, पोलिस उपनिरीक्षक, ८०० पोलिस कर्मचारी व एक हजार होमगार्डचा समावेश आहे
चौकाचौकात तयार केल्या मचाण
चंद्रपुरातील गणेश उत्सव शांततेत पार पडावा. यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त गेला आहे. गर्दीत नियंत्रण ठेवता यावे, यासाठी चौकाचौकात मचाण तयार केले आहेत. यावर पोलिस कर्मचारी तैनार राहणार असून गर्दीवर लक्ष ठेवणार आहेत.
पोलिस अधीक्षक म्हणतात...
"प्रत्येक गणेश मंडळासोबत एक पोलिस कर्मचारी देण्यात आला आहे. शांततेत गणेश विसर्जन होण्याच्या अनुषंगाने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर निघावे. डीजेचा वापर करू नये, लेझर लाइटमुळे डोळ्याला धोका होण्याची शक्यता असल्याने त्यांचाही वापर करू नये, मिरवणुकीत कुणी अनुचित प्रकार करताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलिसांना सहकार्य करावे."
- मुम्मका सुदर्शन, पोलिस अधीक्षक, चंद्रपूर