आयुध निर्माणीच्या भरवसाहतीत बिबट्याचा महिलेवर हल्ला; नागरिक दहशतीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 10:48 AM2023-02-21T10:48:44+5:302023-02-21T10:50:11+5:30

दोन दिवसांपूर्वी बिबट जेरबंद केला त्याच भागात घडली घटना

A leopard attacked a woman in Ordnance Factory area of bhadravati | आयुध निर्माणीच्या भरवसाहतीत बिबट्याचा महिलेवर हल्ला; नागरिक दहशतीत

आयुध निर्माणीच्या भरवसाहतीत बिबट्याचा महिलेवर हल्ला; नागरिक दहशतीत

googlenewsNext

भद्रावती (चंद्रपूर) : आयुध निर्माण येथील सेक्टर ५ या लोकवस्तीत बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केले. उपचारार्थ चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे नागरिकांत प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.

ही घटना सोमवारी सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास घडली. विमलादेवी टिकाराम (४२) असे जखमी महिलेचे नाव आहे. उल्लेखनीय, याच भागात १८ फेब्रुवारीच्या पहाटे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद झाला होता. यावरून या भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे पुढे आले आहे.

विमलादेवी ही महिला नेहमीप्रमाणे सायंकाळी फिरायला निघाली. अशातच परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घेतली. बिबट्याने महिलेची मान जबड्यात पकडली. बिबट्याचा प्रतिकार करण्यात ती यशस्वी झाल्याने थोडक्यात बचावली. मानेला गंभीर इजा झाली आहे. जखमी अवस्थेतील विमलादेवी यांच्यावर आयुध निर्माणीच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच क्षेत्र सहायक विकास शिंदे, वनरक्षक धनराज गेडाम यांनी भेट देऊन महिलेला पुढील उपचारार्थ चंद्रपूरला खाजगी रुग्णालयात रवाना केले आहे.

या सूचनांकडे दुर्लक्ष

वनविभागाने आयुध निर्माणी प्रशासनाला मानव वस्ती भागातील जंगलाची कटाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु त्यांनी अजूनपर्यंत सूचनांचे पालन केलेले नाही. नागरिकांनी सोबत कुत्र्यांना घेऊन फिरू नये, कुत्रे पाळू नयेत आणि पहाटे, सायंकाळी व रात्रीला रस्त्याने पायी, सायकल व दुचाकीने फिरू नये, अशाही सूचना दिल्या होत्या. परंतु याचेही पालन केले जात नाही. या भागात पिंजरे लावले आहेत.

Web Title: A leopard attacked a woman in Ordnance Factory area of bhadravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.