आश्चर्यम ! ३० हजार किमी अंतर गाठले, ते ही उलटे चालून; 'या' व्यक्तीची पंचक्रोशीत होतेय चर्चा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 12:43 PM2022-02-08T12:43:10+5:302022-02-08T13:23:40+5:30
राहुल हे मास्टर ऑफ आर्ट, मास्टर ऑफ मेकॅनिझम, मास्टर ऑफ म्युझिक अशा तीन विषयात एम.ए. आहेत. तरुणाला लाजवेल असे इंग्रजीत संभाषण करीत असतात. तसेच एका पायावर उभे राहून बासरी वाजवितात. सर्वांना मंत्रमुग्ध करतात.
रवी रणदिवे
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : जन्मजात प्रत्येकाला एक तरी गुण निसर्गाने दिला असतो. पण त्या गुणाला विकसित काही व्यक्तीच करीत असतात. अशाच एका अवलिया व्यक्तीने उलटा चालून ३० हजार किमी अंतर गाठले आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे राहुल प्रबुद्ध पेटकर (५९, रा. नागभीड)
राहुल यांचे वय साठीच्या जवळजवळ असूनही ते सोमवारी ब्रह्मपुरीच्या नागभीड-ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्गावर उलटे चालताना दिसले. त्यांच्या हातात इंग्रजी पेपर व एक बासरी होती. मास्टर ऑफ आर्ट, मास्टर ऑफ मेकॅनिझम, मास्टर ऑफ म्युझिक अशा तीन विषयात ते एम.ए. आहेत. तरुणाला लाजवेल असे इंग्रजीत संभाषण करीत असतात. तसेच एका पायावर उभे राहून बासरी वाजवितात. सर्वांना मंत्रमुग्ध करतात.
त्यांच्या या कालागुणाची आता चर्चा होऊ लागली आहे. त्यांनी आता उलट्या पावली चालायचा नवाच उपक्रम सुरू केला आहे. नागपूरला उलटे चालत जाऊन त्यांनी नागपूरकरांना भुरळ घातली होती व त्याची दखल सोशल मीडियानेसुद्धा घेतली आहे. राहुल आज सर्वदूर परिचित झाले आहे. इंग्रजीत संभाषण, उलटे चालने व रस्त्यावर योगासने करणे हा त्यांचा नित्यक्रम ठरला असल्याने जाण्या-येणाऱ्यासाठी ते आकर्षण ठरत आहेत.