कॅन्सर हॉस्पिटलसाठी ४० कोटींचा प्रस्ताव पाठवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 05:00 AM2022-01-30T05:00:00+5:302022-01-30T05:00:43+5:30
चंद्रपूर येथे निर्माणाधीन असलेले कँसर हॉस्पिटलमध्ये १४० बेड असून, २ लक्ष ३५ हजार चौरस फुटांत बांधकाम होणार आहे. रुग्णालयाची इमारत ही तळमजल्यासह पाच मजली राहणार आहे. खनिज विकास निधीतून आतापर्यंत ११३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. जवळपास ५० टक्के काम पूर्ण झाले असून, सिव्हिल वर्कवर ४० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती वैभव गजभिये यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बल्लारपूर रोडवर निर्माणाधीन असलेल्या कँसर हॉस्पिटलची जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाहणी करून बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, बांधकाम प्रकल्प अधिकारी वैभव गजभिये, लेखाधिकारी मयुर नंदा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, टाटा ट्रस्टच्या सहाकार्याने येथील कँसर हॉस्पिटल उभे राहत असले तरी भविष्यात वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ आदी बाबतीत ते व्यवस्थित सुरू राहिले पाहिजे. आपल्या जवळच असलेल्या नागपुरात मोठमोठे कँसर हॉस्पिटल आहेत. मात्र, गरीब लोकांना तेवढा खर्च झेपत नाही. त्यामुळे गरीब रुग्णांचा विचार करून या हॉस्पिटलमध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार होणे गरजेचे आहे. हे रुग्णालय संपूर्णपणे कार्यान्वित होण्यापूर्वी आतापासून नियोजन करून रुग्णालयासाठी लागणारा ४० कोटींचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवावा, असेही ते म्हणाले.
अशी असेल व्यवस्था
- चंद्रपूर येथे निर्माणाधीन असलेले कँसर हॉस्पिटलमध्ये १४० बेड असून, २ लक्ष ३५ हजार चौरस फुटांत बांधकाम होणार आहे. रुग्णालयाची इमारत ही तळमजल्यासह पाच मजली राहणार आहे. खनिज विकास निधीतून आतापर्यंत ११३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. जवळपास ५० टक्के काम पूर्ण झाले असून, सिव्हिल वर्कवर ४० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती वैभव गजभिये यांनी दिली.