भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एकाच परिवारातील तिघे जागीच ठार,राजुरा धोपटाजवळील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 09:53 PM2023-08-13T21:53:23+5:302023-08-13T21:59:30+5:30

राजुरा धोपटाळा पेट्रोल पंपाजवळील घटना

A speeding truck collided with a two-wheeler; Three members of the same family were killed on the spot | भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एकाच परिवारातील तिघे जागीच ठार,राजुरा धोपटाजवळील घटना

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एकाच परिवारातील तिघे जागीच ठार,राजुरा धोपटाजवळील घटना

googlenewsNext

- प्रकाश काळे

गोवरी (चंद्रपूर) : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राजुरा शहरालगत असलेल्या धोपटाला पेट्रोल पंपाजवळ रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, त्याच ट्रकने पुन्हा सामोर जाऊन पुन्हा एका दुचाकीला धडक दिल्याने त्यातील दोघेजण जखमी झाली आहेत.

नीलेश वैद्य (३२), रूपाली वैद्य (२६), मधु वैद्य (३, रा. धोपटाळा) असे पहिल्या अपघातातील मृतकांचे नाव आहे, तर दुसऱ्या अपघातात प्रज्ञा प्रसाद टगराफ (३३), प्रसाद राजाबाई टगराफ (४०, दोघेही रा. रामपूर) असे जखमींचे नाव आहे. अपघाताची माहिती पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. नागरिकांनी ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

धोपटाळा येथील गुरुदेवनगर येथे नीलेश वैद्य वास्तव्याने राहत होते. सकाळी आपल्या पत्नी व मुलीसह बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. सायंकाळी ते काम आटपून घरी येत असताना घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ राजुराकडून सास्तीकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली.

धडक एवढी भीषण होती की, दुचाकी चकाणाचूर होऊन तिघांचाही जागीच मृत्यू झाला, तर समोर याच ट्रकने पुन्हा एका दुचाकीला धडक दिली. यात रामपूर येथील दोघे जखमी झाले आहे. जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात आले. नागरिकांनी ट्रकचालकांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पुढील तपास राजुरा पोलिस करीत आहे.

Web Title: A speeding truck collided with a two-wheeler; Three members of the same family were killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.