शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षिकेला ट्रकने चिरडले; शिक्षिकेचा जागीच मृत्यू 

By परिमल डोहणे | Published: September 4, 2023 08:28 PM2023-09-04T20:28:26+5:302023-09-04T20:28:50+5:30

दुचाकीने शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेला ट्रकने चिरडल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

A teacher was crushed by a truck on the eve of Teacher's Day teacher died on the spot | शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षिकेला ट्रकने चिरडले; शिक्षिकेचा जागीच मृत्यू 

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षिकेला ट्रकने चिरडले; शिक्षिकेचा जागीच मृत्यू 

googlenewsNext

चंद्रपूर : दुचाकीने शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेला ट्रकने चिरडल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शिक्षक दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच ४ सप्टेंबर रोजी चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अनिता किशोर ठाकरे (४८) रा. जगन्नाथ बाबानगर, चंद्रपूर असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. अनिता ठाकरे या लखमापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होत्या. 

नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी त्या आपल्या दुचाकीने (एमएच ३४ बीएस ४९७) जात होत्या. दरम्यान भरधाव वेगाने मागून येणाऱ्या ट्रकने (आरजे ११ जीसी ०८२४) तिला धडक दिली. त्यामुळे ती ट्रकच्या चाकात चिरडली गेली. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.

Web Title: A teacher was crushed by a truck on the eve of Teacher's Day teacher died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.