वाघाने घेतला महिलेचा बळी; दोन दिवसात दोन हल्ले, नागरिक दहशतीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 10:54 AM2023-07-13T10:54:46+5:302023-07-13T10:56:02+5:30

तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील दुसरी घटना

A tiger killed a woman; Two attacks in two days, citizens in fear | वाघाने घेतला महिलेचा बळी; दोन दिवसात दोन हल्ले, नागरिक दहशतीत

वाघाने घेतला महिलेचा बळी; दोन दिवसात दोन हल्ले, नागरिक दहशतीत

googlenewsNext

नागभीड (चंद्रपूर) : शेतात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना बुधवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने वनविभागासह तालुक्यात खळबळ माजली आहे.

दुर्गा जीवन चनफने (४७) असे मृत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, चिमूर तालुक्यातील सावरगाव परिसरात शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर वाघाने हल्ला केल्याने पत्नीसमोर पती ठार झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. मंगळवारी याच वनपरिक्षेत्रात पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाने सावरगाव येथील शेतकऱ्याला ठार केले होते. ही दुसरी घटना आहे. यामुळे वाघाची दहशत पसरली आहे.

दुर्गा चनफने ही महिला गावाजवळ असलेल्या तळोधी रस्त्यावरील आपल्या शेतावर सकाळी गेली होती. बराच उशीर होऊनही ती घरी आली नाही. त्यामुळे कुटुंबीय तसेच गावातील नागरिक तिचा शोध घेण्यासाठी शेताकडे गेले. बराच शोध घेतल्यानंतर वाघाने हल्ला केलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. या बाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले आणि पंचनामा केला. आकापूर ग्रामपंचायतीने मार्च महिन्यात वनविभागास यासंबंधी सूचना देऊन वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली होती. मात्र वनविभागाने याकडे दुर्लक्ष केले. ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: A tiger killed a woman; Two attacks in two days, citizens in fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.