बछड्याला जबड्यात घेऊन निघाली वाघीण, पर्यटकांना दिसली आईची 'माया'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 06:02 PM2022-11-02T18:02:35+5:302022-11-02T18:06:45+5:30

ताडोबातील माया वाघीणीची मायाच एकप्रकारे पर्यटकांनी मनसोक्त अनुभवली. सकाळच्या फेरीत पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना वाटेतच माया वाघीण आपल्या तीन महिन्यांच्या बछड्यासह कोवळ्या उन्हात उभी असलेली दिसली.

A tigress left with a calf in her jaws, tourists saw 'Maya lady tiger in tadoba forest of chandrapur' | बछड्याला जबड्यात घेऊन निघाली वाघीण, पर्यटकांना दिसली आईची 'माया'

बछड्याला जबड्यात घेऊन निघाली वाघीण, पर्यटकांना दिसली आईची 'माया'

googlenewsNext

ताडोबा अभयारण्य फिरायची उत्सुकता आणि मजा काही औरच असते. कारण, वाघोबाचे दर्शन होणार म्हणून पर्यटक खुश असतात. ताडोबाच्या गर्द जंगलात गाडी येताच पर्यटकांची नजर दूरदूर पसरते. पिवळसर अंगावर काळ्या पट्ट्यांनी फिरणाऱ्या वाघोबाचे दर्शन व्हावे म्हणजे आपली यात्रा सुफळ संपूर्ण अशी भावना पर्यटकांची असते. त्याच आशेने आलेल्या पर्यटकांना आज ताडोबा अभयारण्यात सोने पे सुहागा पाहायला मिळाला. कारण, वाघासोबतच तिच्या बछड्याचेही दर्शन पर्यटकांना घडले.  

ताडोबातील माया वाघीणीची मायाच एकप्रकारे पर्यटकांनी मनसोक्त अनुभवली. सकाळच्या फेरीत पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना वाटेतच माया वाघीण आपल्या तीन महिन्यांच्या बछड्यासह कोवळ्या उन्हात उभी असलेली दिसली. ती आपल्या पिलासह खेळत असताना पर्यटकांचे आगमन झाले आणि कॅमेराचा खळखळ आवाज सुरू झाला. त्यामुळे विचलित झालेली ही वाघीण आपल्या पिलाला जबड्यात उचलून जंगलात निघून गेली. मुलांच्या संदर्भात संवेदनशील असलेली आई यानिमित्ताने दिसून आली. मग ती मानवजातीत असो की प्राणीमात्रांमध्ये आई ही आई असते, असेच दर्शन मायाने घडवले. पिलांची सुरक्षितता ही तिच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे या प्रसंगातून दिसून आले. मायाचे हे रूप पर्यटकांनाही सुखावून गेले.

दरम्यान, ताडोबा अभयारण्याला भेट देण्यासाठी दूरवरुन पर्यटक येतात. अनेकदा सेलिब्रिटीही वाघोबाचे दर्शन करण्यासाठी येत असतात. यापूर्वी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ताडोबात जाऊन वाघाचे दर्शन घेतले होते.

Web Title: A tigress left with a calf in her jaws, tourists saw 'Maya lady tiger in tadoba forest of chandrapur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.