आश्चर्य! चिमुकला चित्रांश एका दमात सांगतो २४७ देशांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 10:36 AM2023-01-25T10:36:02+5:302023-01-25T10:38:11+5:30

अद्भुत स्मरणशक्ती, संगीतातही होतो रममाण

A toddler name Chitransh Atram tells the names of 247 countries in one go | आश्चर्य! चिमुकला चित्रांश एका दमात सांगतो २४७ देशांची नावे

आश्चर्य! चिमुकला चित्रांश एका दमात सांगतो २४७ देशांची नावे

googlenewsNext

वसंत खेडेकर

बल्लारपूर (चंद्रपूर) : वय वर्षे पाच! मात्र, त्याची स्मरणशक्ती अफाट व आश्चर्यकारक! एकदा कानावरून गेले, वा वाचले की त्याच्या स्मरणात ते संगणकाप्रमाणे फिट बसते आणि ती माहिती तो लगेचच तंतोतंत एका दमात सांगतो.

चंद्रपूर जिल्ह्यातील १५ही तालुके, देशातील सर्वच राज्यांची नावे आणि जगातील एकूण २४७ देशांची नावे तो पटापट सहजपणे जराही न थांबता सांगत सुटतो. काही देशांची नावे उच्चारायला महाकठीण; पण ती नावे तो स्पष्टपणे उच्चारतो. या अद्भुत स्मरणशक्ती लाभलेल्या चिमुकल्याचे नाव चित्रांश मारुती आत्राम असे आहे. तो चंद्रपूर येथील महेश नगरात राहतो. नारायणा विद्यालयात पहिल्या वर्गाचा तो विद्यार्थी आहे.

अर्थात अभ्यासातही तो हुशार आहे. त्याचे वडील मारुती आत्राम हे त्याच्याविषयी सांगतात, चित्रांश दीड वर्षाचा असताना तो खेळणी सोडून पुस्तकच चाळायचा! त्याच्या जवळचे पुस्तक कोणी हिसकले की तो रडायला लागायचा. पुस्तकांबाबतचा त्याचा हा लळा बघून सहज म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांची नावे त्याला ऐकवली आणि आश्चर्य असे की ती त्याने सर्व नावे लगेचच बरोबर उच्चारलीत. यानंतर राज्यांची नावे, त्यानंतर देशांची नावे त्याने त्याच पद्धतीने अचूक सांगितली. आता तर तो २८७ देशांची नावे न चुकता सांगतो.

छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथाही मुखपाठ

छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास, त्यांची शौर्यगाथा त्याला पाठ आहे. महाराजांचे वडील, आजोबा, आई जिजामाता व राण्यांची नावे सांगतो. संगीताचीही त्याला आवड असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची गाणी तन्मयतेने तो गातो. त्याचे वडील संगीताचे प्रशिक्षक आहेत व आई गृहिणी. चित्रांशची स्मरणशक्ती बघून सारे अचंबित होतात. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर व अनेक मान्यवरांनी त्याची स्मरणशक्ती बघून कौतुकाने त्याची पाठ थोपटली आहे.

Web Title: A toddler name Chitransh Atram tells the names of 247 countries in one go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.