ताडोबा जंगल सफारीदरम्यान मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू; वन विभागाकडून सांत्वन
By राजेश भोजेकर | Updated: May 2, 2023 08:30 IST2023-05-02T08:28:51+5:302023-05-02T08:30:11+5:30
मुंबई येथील काळा आंबा परिसरात वास्तव्य असलेले बालगी हे आपले कुटुंबीयासमवेत ताडोबात सफारीसाठी आले होते

ताडोबा जंगल सफारीदरम्यान मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू; वन विभागाकडून सांत्वन
चंद्रपूर : महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर क्षेत्रात व्याघ्र सफारी करताना हृदयविकाराचा झटका आला असता मुंबई येथील पर्यटक केशव रामचंद्र बालगी (७१) यांचा मृत्यू झाला.
मुंबई येथील काळा आंबा परिसरात वास्तव्य असलेले बालगी हे आपले कुटुंबीयासमवेत ताडोबात सफारीसाठी आले होते. सफारीदरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. पर्यटन मार्गदर्शक व वाहन चालक यांनी त्यांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ बु. येथे आणले असता तेथे वैद्यकिय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. ताडोबा प्रशासनाकडुन मृत पर्यटकांच्या कुटुंबीयाना धीर देउन सांत्वन करण्यात आले, अशी माहिती कोलाराचे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) पी. एल. चव्हाण यांनी दिली.