पाच हजारांची लाच स्वीकारताना महिला वनरक्षकासह पतीला अटक

By परिमल डोहणे | Published: April 18, 2023 12:12 PM2023-04-18T12:12:42+5:302023-04-18T12:13:05+5:30

चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

A woman forest guard and her husband were arrested while accepting a bribe of Rs 5000 | पाच हजारांची लाच स्वीकारताना महिला वनरक्षकासह पतीला अटक

पाच हजारांची लाच स्वीकारताना महिला वनरक्षकासह पतीला अटक

googlenewsNext

चंद्रपूर : अतिक्रमित वनजमिनीवर रोपवन न करण्याच्या कामासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला वनरक्षकासह तिच्या पतीला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली आहे. सावली तालुक्यातील उपरी बिटातील वनरक्षक शारदा कुळमेथे व तिचे पती संजय अंताराम आतला अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत.

तक्रारदाराच्या वडिलाने वनजमिनीवर अतिक्रमण केले होते. त्या वनजमिनीवर वनविभागाकडून रोपवन न करण्याच्या कामासाठी उपरी बिटातील वनरक्षक शारदा कुळमेथे यांनी तक्रारदारास दहा हजार रुपयांची लाच मागितली. तळजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. वनरक्षकांनी आपल्या पतीकडे लाच देण्याचे तक्रारदारास सांगितले. मात्र, त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी यासंदर्भात चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचून वनरक्षकाच्या पतीला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.

ही कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे, पोलिस निरीक्षक शिल्पा भरडे यांच्यासह नरेश नन्नावरे, रवी ढेंगळे, वैभव गाडगे, पुष्पा काथोडे, सतीश सिडाम यांच्यासह चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.

Web Title: A woman forest guard and her husband were arrested while accepting a bribe of Rs 5000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.