धान कापणी करणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 11:09 AM2023-11-02T11:09:19+5:302023-11-02T11:11:09+5:30

हळदा शेतशिवारातील घटना : ऐन हंगामात महिलांमध्ये दहशत

A woman who was harvesting paddy was killed by a tiger | धान कापणी करणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार

धान कापणी करणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार

ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : शेतावर धान कापणी करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना हळदा शेतशिवारातील कंपार्टमेंट ११६८मध्ये बुधवारी दुपारी ३:०० वाजता घडली. या घटनेमुळे महिलांमध्ये दहशत निर्माण झाली असून, शेतावर जाऊन धान कसे कापायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हळदा येथील सायत्राबाई नामदेव कांबळी (६०) ही महिला बुधवारी सकाळी १०:०० वाजता धान कापायला गेली. दुपारी ३:०० च्या सुमारास शेतामध्ये असलेल्या या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. डाेक्याचा भाग छिन्नविछिन्न करून या महिलेला शंभर मीटर अंतरावर असलेल्या कंपार्टमेंट ११६८ मध्ये नेले. या महिलेच्या साेबत असलेल्या महिलांनी आरडाओरडा केल्याने वाघाने महिलेचा मृतदेह तिथेच ठेवून वाघ पळून गेला. घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लगेच दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. शेन्डे, वनक्षेत्र सहायक ए. पी. करंडे घटनास्थळी आपल्या ताफ्यासह दाखल झाले. तसेच मेंडकी पाेलिस घटनास्थळी दाखल झाले.

सकाळी गाेऱ्हयाला केले जखमी

बाेडधा येथील प्रल्हाद जयदेव हुलके हा युवक बैल शेतात चारण्यासाठी जात असताना वाघाने बाेडधा शेतशिवारातील वनविभागाच्या राेपवनासमाेरच एका गाेऱ्हयावर हल्ला करून जखमी केले.

Web Title: A woman who was harvesting paddy was killed by a tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.