बल्लारपुरात आम आदमी पार्टीची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:31 AM2021-08-20T04:31:47+5:302021-08-20T04:31:47+5:30

फोटो बल्लारपूर : नगर परिषद चौकात आम आदमी पार्टीच्यावतीने आयोजित जनआक्रोश आंदोलनात बल्लारपूरच्या जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या, अशी ...

Aam Aadmi Party protests in Ballarpur | बल्लारपुरात आम आदमी पार्टीची निदर्शने

बल्लारपुरात आम आदमी पार्टीची निदर्शने

Next

फोटो

बल्लारपूर : नगर परिषद चौकात आम आदमी पार्टीच्यावतीने आयोजित जनआक्रोश आंदोलनात बल्लारपूरच्या जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या, अशी नारेबाजी करून नगर प्रशासनाचे त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले. यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली.

शहरातील विविध प्रश्नांना घेऊन नगर प्रशासनास आप पक्षाच्यावतीने वारंवार निवेदन देण्यात येत आहे. तरीसुद्धा प्रशासन समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे बुधवारी दुपारी आपचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, तसेच भिवराज सोनी, ॲड. किशोर पुसलवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजुराचे प्रदीप बोबडे, रोशन येवले, भद्रावतीचे सुमित हस्तक, चंद्रपूरचे सिकदार सागोरे, दिलीप तेलंग, बल्लारपूर शहर अध्यक्ष रवी पुप्पलवार, तसेच अफजल अली, राकेश वडस्कर, ॲड. पवन वैरागडे, आसिफ शेख, नीलेश जाधव, महिला शहरअध्यक्ष अल्का वेले व इतर सदस्यांनी बल्लारपूर समस्या घेऊन जोरदार प्रदर्शन केले.

संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल माफ करण्यात यावे व इतर समस्या लवकर सोडविण्यात याव्या, अशा घोषणा देऊन नारेबाजी केली. या संदर्भातील निवेदन प्रशासनास देण्यात आले.

190821\aap.jpg

नगर परिषद चौकात प्रदर्शन करताना आप चे कार्यकर्ते

Web Title: Aam Aadmi Party protests in Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.