अबब... वॉशबेसिनच्या जाळीत अडकला साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 05:00 AM2021-08-05T05:00:00+5:302021-08-05T05:00:37+5:30
विवेकानंद महाविद्यालय परिसरात घरगुती मेस चालविणारे विनोद रुयारकर यांची पत्नी नेहमीप्रमाणे सकाळी स्वयंपाकाच्या कामाला लागली. अशातच वॉशबेसिनमध्ये ठेवलेले भांडे घ्यायला गेली असता वॉशबेसिनच्या जाळीमध्ये एक साप अडकलेला दिसला. हे दृश्य बघताच त्यांची भांबेरी उडाली. हा प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यांनी त्या सापाला पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो साप जाळीत अडकला असल्यामुळे त्याला निघता येत नव्हते.
भद्रावती : भांडे धुण्याच्या बेसिनच्या जाळीमध्ये चक्क साप अडकल्याची घटना विवेकानंद महाविद्यालय परिसरात बुधवारी घडली. इको-प्रोच्या सदस्यांनी सापाची सुखरूप सुटका केल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
विवेकानंद महाविद्यालय परिसरात घरगुती मेस चालविणारे विनोद रुयारकर यांची पत्नी नेहमीप्रमाणे सकाळी स्वयंपाकाच्या कामाला लागली. अशातच वॉशबेसिनमध्ये ठेवलेले भांडे घ्यायला गेली असता वॉशबेसिनच्या जाळीमध्ये एक साप अडकलेला दिसला. हे दृश्य बघताच त्यांची भांबेरी उडाली. हा प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यांनी त्या सापाला पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो साप जाळीत अडकला असल्यामुळे त्याला निघता येत नव्हते. रुयारकर यांनी ही माहिती इको प्रोचे सदस्य दीपक कवठे यांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठले. जाळीतून सापाला काढण्याचे प्रयत्न केला, परंतु साप निघू शकला नाही. सहकारी अमोल दौलतकर, शुभम मेश्राम यांना लोखंडी पत्रा कापण्याचे कटर आणायला सांगितले. अथक प्रयत्नानंतर जाळी कापून सापाला मुक्त केले.