बांबूमध्ये जिल्ह्याचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:29 AM2021-09-19T04:29:03+5:302021-09-19T04:29:03+5:30

चंद्रपूर : बांबूमुळे अन्न, औषध, हस्तव्यवसाय, फर्निचर, कृषी, निसर्ग पर्यटन, कागदनिर्मिती प्रकल्प आदी क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो. बांबूपासून ...

Ability to change the economy of the district in bamboo | बांबूमध्ये जिल्ह्याचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता

बांबूमध्ये जिल्ह्याचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता

Next

चंद्रपूर : बांबूमुळे अन्न, औषध, हस्तव्यवसाय, फर्निचर, कृषी, निसर्ग पर्यटन, कागदनिर्मिती प्रकल्प आदी क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो. बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या शोभेच्या वस्तूंची बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीचे बांबू सक्षम साधन असून बांबूमध्ये जिल्हाचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर आणि बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली यांच्या वतीने चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधनी येथे जागतिक बांबू दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनरक्षक एन. आर. प्रवीण, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर, उपवनरक्षक अरविंद मुंढे, दीपेंद्र मल्होत्रा, जी. गुरुप्रसाद, नंदकिशोर काळे, बांबू संशोधन केंद्राचे संचालक के. एम. अभर्णा, किशोर कोने आदी उपस्थित होते.

आ. जोरगेवार पुढे म्हणाले, बांबू ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी बहुउपयोगी वनस्पती आहे. याचे फायदे जनजागृतीच्या माध्यमातून पोहविण्याची गरज आहे. चंद्रपुरातील जमीनही बांबू उत्पादनासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे बांबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येईल या दिशेने वन विभागाने प्रयत्न करावेत. बांबूवर आधारित पारंपरिक व आधूनिक उद्योग निर्मिती करणाऱ्या उद्योजकांना सवलत देण्यात यावी, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बांबू रोपट्याचा पूरवठा करण्यात यावा असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: Ability to change the economy of the district in bamboo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.