पीक कर्ज घेण्यासाठी लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:29 AM2021-05-19T04:29:46+5:302021-05-19T04:29:46+5:30
रस्त्यावरच केली जाते भाजीविक्री चंद्रपूर : कोरोनाचे सावट असल्यामुळे बाजारपेठ सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरु राहत आहे. त्यामुळे काही छोटे ...
रस्त्यावरच केली जाते भाजीविक्री
चंद्रपूर : कोरोनाचे सावट असल्यामुळे बाजारपेठ सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरु राहत आहे. त्यामुळे काही छोटे व्यावसायिक जागा मिळेल, त्या ठिकाणी बसून भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करीत आहे. विशेष म्हणजे, रामनगर, तसेच वडगाव परिसरामध्ये रस्त्याच्या कडेलाच बसून भाजी विक्रेते भाजी विकत आहे.
पावसाळ्यापूर्वी नाल्या स्वच्छ कराव्या
चंद्रपूर : आता पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. मात्र, नाल्या स्वच्छतेला पाहिजे, तशी गती अजूनही आली नाही. महापालिका प्रशासनाने शहरातील नाल्यांची स्वच्छता अधिक गतीने करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कूलर व्यावसायिक अडचणीत
चंद्रपूर : मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीही लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे बाजारपेठ बंद आहे. परिणामी, कूलर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यावसायिकांनी उन्हाचे दिवस लक्षात घेता, मोठ्या प्रमाणात कूलर बुक करून ठेवले आहे. मात्र, विक्रीच होत नसल्याने त्यांच्यासमोर आला मोठा प्रश्न पडला आहे.
पैसे जमा झाल्याने दिलासा
चंद्रपूर : मागील तीन दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे. त्यामुळे लाॅकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्यांना थोडी-फार मदत झाली आहे. मात्र, दुसरीकडे खतांचे दर वाढविल्यामुळे शेतकऱ्यांत नैराश्य पसरले आहे.
लसीकरणासाठी जनजागृती करावी
चंद्रपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आता कोरोनावर लसीकरणाचा पर्याय आहे. मात्र, आजही पाहिजे तशी जनजागृती झाली नसल्यामुळे ग्रामीण, तसेच शहरातील काही नागरिक लसीकरणासाठी समोर येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा, तसेच महापालिका प्रशासनाने जनजागृती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बाजारात नागरिकांची गर्दी
चंद्रपूर : येथील गोल बाजार, तसेच गंज वार्डातील भाजीबाजारामध्ये नागरिक खरेदीसाठी गर्दी करीत आहे. या गर्दीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सकाळी ११ वाजेपर्यंतच बाजार सुरू राहत असल्यामुळे यावेळेच एकच गर्दी होत आहे.
खासगी शिक्षकांची चिंता वाढली
चंद्रपूर: मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीही लाॅकडाऊन करण्यात आले. दरम्यान, या वर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षाही झाल्या नाही. त्यातच कोरोनाचे संकट अद्यापही संपले नसल्यामुळे पुढील वर्षीही शाळा होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे खासगी शाळांतील शिक्षकांची चिंता वाढली आहे.
वाहनचालकांचे संकट वाढले
चंद्रपूर : शासनाने लाॅकडाऊन करताना गरिबांचे नुकसान टाळण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहे. त्यानुसार, काही लाभार्थ्यांना लाभही झाला आहे. मात्र, खासगी शाळांतील, तसेच इतर वाहन चालकांना कोणताच लाभ मिळाला नसल्यामुळे त्यांच्यामध्ये चिंता वाढली आहे.
रोजगार देण्याची मागणी
चंद्रपूर : मागील वर्षीपासून कोरोना संकट घोंघावत आहे. त्यातच आता लाॅकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. परिणामी, उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी करण्यात आली आहे.
डागडुजींची कामे रखडली
चंद्रपूर : पावसाळा तोंडावर आला आहे. मात्र, कोरोना लाॅकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहे. परिणामी, घरांच्या डागडुजीची कामे रखडली आहे. त्यामुळे शासनाने लाॅकडाऊन शिथिल करून व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्त्यावर साचला कचरा
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरातील काही वार्डातील स्वच्छता नियमित केली जात नसल्यामुळे रस्त्यांवर कचरा साचला आहे. त्यामुळे याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
मास्कमुळे जनावरांचा धोका
चंद्रपूर : कोरोनामुळे प्रत्येकांना मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले. मात्र, मास्क लावल्यानंतर ते इतरत्र कुठेही फेकून दिल्या जात असल्यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरात अनियमित पाणीपुरवठा
चंद्रपूर : शहरात महापालिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणीपुरवठा अनियमित केला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नियमित पाणीपुरवठा करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्त्यांच्या कामांना गती
चंद्रपूर : येथील गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गाचे रुंदीकरण केले जात आहे. सदर काम मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आले असून, सद्यस्थितीत कामाने चांगलीच गती घेतली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी काम होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.