गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:27 AM2021-03-26T04:27:32+5:302021-03-26T04:27:32+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा व महाविद्यालये १५ मार्च २०२० ला बंद करण्यात आली. मागील वर्षी जवळपास शैक्षणिक वर्ष पूर्ण ...

Absentee students are not admitted to the next class | गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश नाही

गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश नाही

Next

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा व महाविद्यालये १५ मार्च २०२० ला बंद करण्यात आली. मागील वर्षी जवळपास शैक्षणिक वर्ष पूर्ण होत आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पास करण्यात आले; परंतु शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जवळपास १५ ते २० टक्के विद्यार्थी शाळेपासून आजही दूर आहेत. त्यांनी ऑफलाईन, ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केला नाही. त्यातच त्यांचे पालक शाळा व्यवस्थापनाच्या संपर्कात नाही. अनेकांनी कोरोनामुळे स्थलांतरणही केले आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता आणखी पुढील वर्षात प्रवेश दिल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती इनडिपेन्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनला आहे. त्यामुळे संघटनेने अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणार नसल्याची भूमिका स्पष्ट केेली असून, यासंदर्भात शासनस्तरावर निवेदनही देण्यात आले आहे. त्यामुळे यावर शिक्षण विभाग तसेच शासन काय निर्णय घेतात, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Absentee students are not admitted to the next class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.