सूक्ष्म नियोजन करून लसीकरणाला गतिमान करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:36 AM2021-04-30T04:36:57+5:302021-04-30T04:36:57+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक चंद्रपूर : राज्य शासनातर्फे १८ वर्षावरील ...

Accelerate vaccination with meticulous planning | सूक्ष्म नियोजन करून लसीकरणाला गतिमान करा

सूक्ष्म नियोजन करून लसीकरणाला गतिमान करा

Next

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक

चंद्रपूर : राज्य शासनातर्फे १८ वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाबाबत लवकरच विस्तृत सूचना प्राप्त होतील; मात्र तोपर्यंत लसीकरणाबाबत जिल्हा स्तरावर सूक्ष्म नियोजन करून तयारीत राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत दिल्यात.

जिल्ह्यात वाढत असलेली रुग्णसंख्या व त्यासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच नागरिकांच्या लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक पार पडली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात कोरोनासदृश परिस्थितीत व्हेंटिलेटर, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपलब्ध औषधसाठा तसेच कोविडच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी जसे की जम्बो सिलिंडर, ऑक्सिजन प्लांट, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यासारख्या गोष्टींची कमतरता असल्यास त्वरित उपलब्ध करून घ्याव्यात.

कोविड काळात रुग्णांना विहित वेळेत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी व्हेंटिलेटर, औषध साठा, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन प्लांट, जम्बो सिलिंडर इत्यादी आवश्यक साधन सामग्रीच्या उपलब्ध साठ्याची माहिती तयार करून ठेवावी, असेही ते म्हणाले.

बॉक्स

लसीकरणासाठी १९४ चमू कार्यरत

केंद्र शासनाने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना १ मे पासून लस देण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी याबाबत राज्य शासनातर्फे विस्तृत मार्गदर्शन प्राप्त झाल्यावरच प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सध्या लसीकरणासाठी सहा खासगी लसीकरण केंद्र सुरू असून, जिल्ह्यात लसीकरणासाठी १९४ टीम कार्यरत आहेत, तसेच ग्रामीण भागात आणखी ४० टीम वाढविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी लसीकरण अधिकारी डाॅ. संदीप गेडाम यांनी दिली.

बॉक्स

आरटीपीसीआर नमुने वाहतुकीसाठी नऊ वाहने

आरटीपीसीआर तपासणी नमुन्यांच्या वाहतुकीसाठी नऊ वाहने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तालुका स्तरावर वाहनांची आवश्यकता असल्यास उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांनी मागणी करून घ्यावी व तसे प्रस्ताव सादर करावे, असेही ते म्हणाले.

बॉक्स

विलगीकरण कक्षासाठी ग्रामपंचायतींना निधी

तालुका स्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीला आयसोलेशन सेंटर तयार करण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या निधीचा अनुषंगिक वापर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. कोरोना संकटाच्या काळात मनुष्यबळाची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. त्यामुळे तालुका स्तरावर एएनएम पुढे येऊन सेवा द्यावी. त्यांना त्यांच्या तालुक्याच्या कोविड केअर सेंटरमध्येच सेवा उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी म्हटले.

Web Title: Accelerate vaccination with meticulous planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.