ग्रामीण भागाच्या विकासाकरिता कामाची गती वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:44 AM2021-02-23T04:44:38+5:302021-02-23T04:44:38+5:30

बाळू धानोरकर : दिशा समितीची आढावा बैठक चंद्रपूर : ग्रामीण भाग सुजलाम्‌ सुफलाम्‌ करण्याकरिता सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी कामाची गती ...

Accelerate the work for the development of rural areas | ग्रामीण भागाच्या विकासाकरिता कामाची गती वाढवावी

ग्रामीण भागाच्या विकासाकरिता कामाची गती वाढवावी

Next

बाळू धानोरकर : दिशा समितीची आढावा बैठक

चंद्रपूर : ग्रामीण भाग सुजलाम्‌ सुफलाम्‌ करण्याकरिता सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी कामाची गती वाढवावी, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी आज नियोजन भवन चंद्रपूर येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत केले.

या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, अंत्योदय योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, आवास योजना, ग्रामीण पाणीपुरवठा, पीक विमा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, इंदिरा आवास योजना, घरकुल शहरी व ग्रामज्योती विद्युत योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, विधवा निवृत्ती वेतन, अपंग निवृत्ती वेतन, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना यासारख्या महत्त्वाच्या विषयाचा आढावा घेतला.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग-३ मध्ये १७६ किमीच्या रस्त्याची अंदाजपत्रके तयार झाली आहेत. पुलाचे सर्वेक्षण व अंदाजपत्रकाच्या कामांना गती देऊन तातडीने कामे पूर्ण करावी, अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. याप्रसंगी आ. प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, प्रकल्प संचालक गिरवे व भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक शंकर किरवे यांनी बैठकीचे प्रास्ताविक करून मागील इतिवृत्ताची माहिती दिली. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Accelerate the work for the development of rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.