चंद्रपूरात कोळसा खाणीत दुर्घटना, तीन कामगारांना ढिगा-याखालून काढले बाहेर, अजूनही काही कामागार अडकल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 09:22 AM2017-12-01T09:22:08+5:302017-12-01T09:24:57+5:30
वेकोलि माजरीच्या जूना कुणाडा कोळसा खाणीत शुक्रवारी सकाळी मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगा-याखाली काही कामगार दाबल्याची भीती व्यक्त होतं आहे.
चंद्रपूर - वेकोलि माजरीच्या जूना कुणाडा कोळसा खाणीत शुक्रवारी सकाळी मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगा-याखाली काही कामगार दाबल्याची भीती व्यक्त होतं आहे. तिघा कामागारांना बाहेर काढण्यात आले असून, गंभीर जखमी अवस्थेतील या कामगारांना नागपूरला हलविल्याची माहिती आहे. आठ वोल्वो टिप्पर, दोन ड्रिल मशीन, चार पीसी मशीन व एक सर्व्हिसिंग गाडी दबली आहे. काही कामगारही दबल्याची शंका आहे.
वेकोलितील ही दुसरी घटना आहे. मागील आठवड्यात याच परिसरातील तेलवासा खाणीत अशीच घटना घडली होती. वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत कोळशाचा ढिगारा कोसळला होता. यामध्ये तिथे काम करणारा डोजर ऑपरेटर निरजु झा (५५) हा दबून जागीच ठार झाला होता. या ठिकाणी काम करणारे दहा कामगार बचावले होते. मागच्या शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.
वरती साठ ते सत्तर मीटर शेकडो टन कोळसा होता. त्यामुळे शनिवारी सकाळी ७-३० वाजता कामगाराचा मृततदेह बाहेर काढण्यात आला होता. तेलवासा खुल्या खाणीत कोळसा फेस वरून ३०० मीटर उंच आहे. याचे बनवलेले बेंच पूर्वीपासूनच धोकादायक होते. त्यामुळे गेल्या वर्षी वेकोलिच्या सतर्क विभागाच्या अधिका-यांनी खाण बंद करण्याचे आदेश दिले होते.