रस्त्यावरील खड्डयामुळे बांधकाम कंत्राटदारांचा अपघाती मृत्यू; धाबा-गोंडपिपरी मार्ग बनतोय जीवघेणा
By परिमल डोहणे | Published: January 13, 2024 06:59 PM2024-01-13T18:59:09+5:302024-01-13T18:59:26+5:30
चंद्रपूर : गोंडपिपरी-धाबा मार्गांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. रस्त्यावरील खड्डयामुळे अपघातात मोठी वाढ ...
चंद्रपूर : गोंडपिपरी-धाबा मार्गांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. रस्त्यावरील खड्डयामुळे अपघातात मोठी वाढ झाली आहे. गोंडपिपरीचे बांधकाम कंत्राटदार अनिल झाडे यांचा धाबा गावाजवळील जनता विद्यालयाजवळ अपघात होवून त्यांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शुकवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
गोंडपिपरीचे बांधकाम कंत्राटदार हे आपल्या आईला आणण्यासाठी पोडसा येथे जात असतांना रस्त्यावरील खड्डयांमुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन झाडाला आपटले. त्यामुळे झाडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. धाबा-गोंडपिपरी मार्गांवरील खड्ड्यामुळे एका बांधकाम कंत्राटदारांला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हा मार्ग कधी होणार असा प्रश्न आता परिसरातील नागरिक विचारू लागले आहे.