शारीरिक शिक्षण, क्रीडा संशोधन केंद्रास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:18 AM2021-06-27T04:18:57+5:302021-06-27T04:18:57+5:30
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विवेक शिंदे यांच्या प्रयत्नातून व सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या संशोधन केंद्राला मान्यता ...
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विवेक शिंदे यांच्या प्रयत्नातून व सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या संशोधन केंद्राला मान्यता मिळाली आहे. आदिवासी, ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आता पदव्युत्तर पदवी व शारीरिक शिक्षण विभागातील पीएच.डी. पदवी प्राप्त करता येईल व उच्च शिक्षणाचा लाभ घेता येईल. गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीनंतर शारीरिक शिक्षण विभागाला पहिल्यांदाच भद्रावती येथे शारीरिक शिक्षण व क्रीडा संशोधन केंद्र प्राप्त झाले आहे.
भद्रावतीसारख्या आदिवासीबहुल, ग्रामीण भागात शारीरिक शिक्षण व क्रीडा संशोधन केंद्र प्राप्त झाल्याबद्दल भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती या संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लाडके, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी आनंद व्यक्त केला आहे.