बनावट फेसबुक आयडी तयार करणारा आरोपी गजाआड

By admin | Published: September 19, 2015 01:22 AM2015-09-19T01:22:55+5:302015-09-19T01:22:55+5:30

मेंडकी उपपोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या हळदा (आवळगाव) येथील हरबच्चन सिंग गुरुदीप सिंग टांक या इसमाच्या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करुन ....

The accused accused of making fake Facebook ID | बनावट फेसबुक आयडी तयार करणारा आरोपी गजाआड

बनावट फेसबुक आयडी तयार करणारा आरोपी गजाआड

Next

अश्लील फोटो केले अपलोड : आरोपीला न्यायालयीन कोठडी
मेंंडकी : मेंडकी उपपोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या हळदा (आवळगाव) येथील हरबच्चन सिंग गुरुदीप सिंग टांक या इसमाच्या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करुन त्यावर अश्लील फोटो व मजकूर अपलोड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
सोरेनसिंग संगतसिंग दुधानी (२२) रा. कॉलरी वार्ड वरोरा असे आरोपीचे नाव आहे. हळदा (आवळगाव) येथील हरबच्चनसिंग गुरुदीपसिंग टांक (२९) यांच्या नावाने सोरेनसिंग याने फेसबुकची बनावट आयडी सुरू केली. त्यावर हरबच्चनसिंग गुरुदीपसिंग टांक याचे फ्रोफाईलवर फोटो टाकून त्यांच्या फेसबुक आयडीवर फ्रेन्ड्स रिक्वेस्ट (विनंती) पाठविली असता हरबच्चनसिंग गुरुदीपसिंग टांक यांनी ती फ्रेन्ड्स रिक्वेस्ट स्वीकारली. तेव्हा हरबच्चन सिंग टांक यांना फेसबुक आयडीवर आपली स्वत:चे प्रोफाईल फोटो असल्याचे निदर्शनात आले. परंतु, याकडे हरबच्चनसिंग टांक यांनी दुर्लक्ष केले.
याच संधीचा फायदा घेत सोरेनसिंग दुधानी याने फेसबुक आयडीचा गैरफायदा घेत होता. फेसबुक आयडीवर अश्लील फोटो व मजकूर अपलोड करुन सोरेनसिंग दुधानी हा सतत फेसबुकवर आॅनलाईन राहायचा. हा प्रकार जास्त वाढला.
त्यामुळे हरबच्चनसिंग टांक यांनी त्याच्याविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मेंढकी पोलिसांनी याची दखल घेत आरोपी सोरेनसिंग संगतसिंग दुधानी याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस करीत असून ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांच्या मार्गदर्शनात केली. (वार्ताहर)

Web Title: The accused accused of making fake Facebook ID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.