बँकेत चोरीचा प्रयत्न करणारे आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:30 AM2021-08-26T04:30:11+5:302021-08-26T04:30:11+5:30
घटनेच्या दिवशी रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास विदर्भ कोकण ग्रामीण बँक शेषनगर, ब्रह्मपुरी येथे काही अज्ञात चोरांनी बँकमध्ये ...
घटनेच्या दिवशी रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास विदर्भ कोकण ग्रामीण बँक शेषनगर, ब्रह्मपुरी येथे काही अज्ञात चोरांनी बँकमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने शटरचे कुलूप तोडले. सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. आलार्मची वायर कापून चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या प्रसंगावधनाने हा प्रयत्न निष्फळ ठरला. पोलिसांनी परिसरामधील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार व नागरिकांना विचारपूस केली असता परिसरात काही ठिकाणी आरोपी आढळून आले. सर्व आरोपी मालडोंगरी येथील असल्याचे पोलिसांना कळले. लगेच योगीराज पोहनकर, सचिन ठाकरे या दोघांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आरोपींनी गुन्हा कबूल केला असून, तोडलेला सीसीटीव्ही कॅमेरा जवळच्या बोडीमधून ताब्यात घेण्यात आला. पुढील कारवाई ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.
250821\1420-img-20210825-wa0010.jpg
गजाआड करण्यात आलेले आरोपी