दिव्यांगत्वावर मात करणारे कर्तृत्व

By Admin | Published: March 4, 2017 12:39 AM2017-03-04T00:39:10+5:302017-03-04T00:39:10+5:30

नागपूर विभागातून महिला बचत गटांना हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी चंद्रपुरात सरस महोत्सव ‘स्वयंसिध्दा-२०१७’चे आयोजन करण्यात आले आहे.

Achievement of Divinity | दिव्यांगत्वावर मात करणारे कर्तृत्व

दिव्यांगत्वावर मात करणारे कर्तृत्व

googlenewsNext

कामातून देशनिष्ठा: काष्टशिल्पातील कलावंत जपणारा बचतगट
चंद्रपूर : नागपूर विभागातून महिला बचत गटांना हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी चंद्रपुरात सरस महोत्सव ‘स्वयंसिध्दा-२०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये विविधांगाने कलाकृती बचत गट सहभागी आहेत. काष्टशिल्पातील देशाप्रती भावना प्रदान करणारा गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील जयदुर्गा महिला स्वयंसहायता बचत गट महोत्सवामध्ये आकर्षण ठरला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जयदुर्गा महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची यशोगाथा धडधाकट शरीर असलेले जे करु शकत नाही ते एका जन्मताच मुकबधिर असलेल्या व्यक्तिच्या अंगी नैसर्गिक कलागुण उफाळून येते. पुढे ही काष्टशिल्प कलाकृती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ही यशोगाथा रेखाताई सेलोटे यांचे पती प्रभाकर सेलोटे जन्मताच मुकबधिर आहे. मात्र जगण्याचे चांगले गुण त्यांच्यामध्ये जन्मजात उपजत आहेत.
आदिवासी भागातील काष्टशिल्पातून देशाप्रती भावना अर्पण करणारा कलावंत हा कलावंत सागवानाच्या लाकडातून सुंदर, मोहक व आकर्षक अशा देशाप्रेमावर आधारित शासकीय विभागाशी निगडीत अशा कलाकृती निर्माण करतात. त्याची ही कलाकृती पाहून अनेकांना हेवा वाटावा, अशा प्रकारचे काष्टशिल्प सतत तयार करीत आहे. निव्वळ कला निर्माण करुन चालत नाही.
पतीच्या कलेप्रती मेहनतीला न्याय देण्यासाठी लक्ष्मीच्या रुपात रेखाताई यांनी समोर येऊन गावात जयदुर्गा महिला स्वयंसहायता बचत गट स्थापन केला. हा गट रेखाताईचे पती प्रभाकर सलोटे यांनी तयार केलेल्या काष्टशिल्पास मदत करीत आहेत. चंद्रपूरमध्ये चांदा कल्ब ग्रांऊडवर दोन दिवसांपासून असलेल्या सरस महोत्सवामध्ये आकर्षण ठरला आहे.
या बचत गटातील महिलांना मिळालेले व्यासपिठ व त्याचा खरा फायदा या सरस महोत्सावातून होत आहे. त्यांना कला प्रदर्शन व विक्रीचे व्यासपीठ प्राप्त झाले आहे. त्यांच्या कर्तुत्वाला सलाम असल्याचे स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण सवांद सल्लागार कृष्णकांत खानझोडे म्हणाले. (प्रतिनिधी)

या बचत गटा अंतर्गत भारतांची संसद, राजमुद्रा, तिरंगा, शहिद स्मारक, भारताचा राष्ट्रिय पक्षी मोर, विमान , कासव, इतकेच नव्हे तर विविध विभांगाचे प्रतिक असणारे स्मृती चिन्ह यासारख्या सुबक अशा देशनिष्टा जपणारे काष्ट शिल्प तयार करुन या बचत गटाअंतर्गत विविध ठिकाणी होणाऱ्या महोत्सावामध्ये बाजारपेठ निर्माण करण्याचा प्रयत्न हा बचत गट करीत आहे.

या बचत गटाने निर्माण केलेले लाकडातील काष्टशिल्प खरोखरच मनस्वी व अभिमान वाटावे अशीच आहे. सरस महोत्सव स्वयसिध्दाद्वारा अशाच प्रकारच्या कलागूण जोपासणाऱ्या बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व महिला स्वंयसहायता बचत गटाच्या मदतीने प्रत्येकाचा आर्थिक विकास व्हावा हाच आमचा प्रयत्न आहे.
- एम . डी. सिह, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद.

Web Title: Achievement of Divinity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.