कोरोना नियमांचे पालन करुन २८८ शाळेत ज्ञानार्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:25 AM2021-08-01T04:25:49+5:302021-08-01T04:25:49+5:30
कोरोनामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ...
कोरोनामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी १५ जुलैपासून जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ६१७ शाळेपैकी पहिल्या दिवशी म्हणजेच १५ जुलैला १५२ शाळा सुरू झाल्या. त्यानंतर दररोज शाळा सुरु होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. आता जिल्ह्यातील २८८ शाळा सुरू असून १५ हजार ७९ विद्यार्थी शाळेत ज्ञानार्जन करीत आहेत.
बॉक्स
विद्यार्थ्यांच्या संख्येत होतेय वाढ
कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्यशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने १५ जुलैपासून चंद्रपूर जिल्ह्यातील १५२ शाळा सुरू झाल्या. त्यानंतर दररोज शाळा सुरू होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. ३० जुलैला जिल्ह्यातील ६१७ शाळांपैकी २८८ शाळा सुरू झाल्या आहेत. एकूण पटसंख्या एक लाख २८ हजार ३५ पैकी १५ हजार ७९ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते.
बॉक्स
विद्यार्थी मजेत पालक चिंतेत
दोन वर्षांपासून शाळा बंद होती. त्यामुळे मित्रमंडळीची भेट होत नव्हती. तसेच कोरोनाची दहशत असल्याने घराबाहेर पडतासुद्धा येत नव्हते. आता शाळा सुरू झाल्याने सर्वांसोबत खेळता येते.
-रोहित गेडाम, विद्यार्थी
-------
सतत घरी राहून कंटाळा आला होता. आता शाळेत गेल्यानंतर सर्व मित्र मिळतात. मिळून दंगामस्ती करता येते, खेळता येते. त्यामुळे शाळेत जायला मज्जा येत आहे.
-प्रशांत रायपुरे, विद्यार्थी
------
तिसरी लाट येण्याची शक्यता असून बालकांना त्याचा धोका असल्याचे इशारा आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवतांना भीती वाटते. परंतु, शाळा बंद राहिली तर शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे घाबरतच मुलाला शाळेत पाठवत आहे.
-गोविंदा गेडाम, पालक
----
जिल्ह्यातील ८ ते १२ च्या एकूण शाळा ६१७
सुरू झालेल्या शाळा २८८
८ ते १२ ची पटसंख्या एक लाख २८ हजार ३५
८ ते १२ ची उपस्थिती १५ हजार ७९