ब्रह्मपुरी पोलिसांची १०९ वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:42 PM2018-06-17T23:42:59+5:302018-06-17T23:43:14+5:30
तालुक्यात अल्पवयीन वाहनचालकांचा झालेला सुळसुळाट व वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्यांवर वचन बसविण्यासाठी ब्रह्मपुरी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत रविवारी १०९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : तालुक्यात अल्पवयीन वाहनचालकांचा झालेला सुळसुळाट व वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्यांवर वचन बसविण्यासाठी ब्रह्मपुरी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत रविवारी १०९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन अशा वाहन चालकांवर कायद्याचा वचक बसावा व तालुक्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरू रहावी, यासाठी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया १०९ दुचाकी वाहनचालकांवर कारवाई केली.
ब्रम्हपुरी--वडसा मार्गावरील चिंचोली फाट्याजवळील पेपर मिल चौकात त्यांनी ही विशेष मोहीमच राबविली. यामुळे विनापरवाना, बेजबाबदारपणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांच्या मनात धडकी भरली आहे.